कसाबच्या वेळीही इतका पोलीस बंदोबस्त नव्हता - आदित्य ठाकरे

बसमधून विधानभवनात आलेल्या आमदारांकडे पाहून वाईट वाटतंय, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
Aditya Thackeray
Aditya Thackeray Sakal

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत. दरम्यान, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे हेही त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेना आमदारांसोबत दाखल झाले आहेत. त्यावेळी त्यांनी शिंदे गटासह भाजपावरही टीका केली आहे. तसंच विधानभवन परिसरातल्या सुरक्षेवर टीका केली आहे. (Aditya Thackeray at Maharashtra Assembly)

Aditya Thackeray
Maharashtra Assembly Live: कामकाजाला सुरुवात; शिंदे गटासह भाजपा आमदार फेटे घालून मैदानात

विधानभवनाबाहेरच आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या व्हीपबद्दलही माहिती दिली. सुनील प्रभूंनी जारी केलेला व्हीप हाच अधिकृत आहे आणि तोच महत्त्वाचा आहे, असंही त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. तसंच त्यांनी विधानभवन परिसरातल्या सुरक्षेवरही टीका केली आहे.

Aditya Thackeray
आदित्य ठाकरे फिल्मी स्टाईल म्हणाले, हम शरीफ क्या हुए...

आदित्य ठाकरे म्हणाले की, विधानभवनात (Maharashtra Assembly) सुरक्षा जास्तच कडक करण्यात आली आहे. माध्यमं आणि आमदारांमध्ये दोरी बांधण्यात आली आहे. ही दोरी कधीच नव्हती. एवढी कसली भीती आहे? आता तुम्ही त्यांनाही पळवणार आहात आणि गुवाहाटीला नेणार आहात की आम्ही काही करणार आहोत. सरकारचा एवढा बंदोबस्त असताना, आमदारांना कोणताही धोका नसताना एवढा बंदोबस्त कशाला? कसाबच्या वेळीही एवढा बंदोबस्त नव्हता किंवा एरवी कधीच मुंबईत एवढा बंदोबस्त नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com