यावेळेस कमळ गाडणार म्हणजे गाडणारच: आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यातील प्रचारयुद्धास सुरवात झाली असून, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी यावेळी पालघरमध्ये कमळ गाडणार म्हणजे गाडणारच असा दावा केला आहे.

पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यातील प्रचारयुद्धास सुरवात झाली असून, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी यावेळी पालघरमध्ये कमळ गाडणार म्हणजे गाडणारच असा दावा केला आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपने राजेंद्र गावित यांना मैदानात उतरविले आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांनी जनताच शिवसेनेला जागा दाखवेल असा आरोप केल्यानंतर आज (बुधवार) पालघरमध्ये प्रचारासाठी आलेल्या आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे यांनी विक्रमगड विधानसभा मतदार संघातून प्रचाराला सुरवात केली.

आदित्य ठाकरे म्हणाले, की श्रीनिवास वनगा हे जिंकून दिल्लीत जाणार याचा आम्हाला विश्वास आहे. ही लढाई नैतिकतेची आहे. भाजपाने नैतिकता सोडली आहे. या वेळेस कमळ गाडणार म्हणजे गाडणारच. श्रीनिवास वनगा यांचा विजय निश्चित आहे.

Web Title: aditya thackeray speaks in palghar about bjp