आदित्य ठाकरे वरळीतून लढणार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

वरळीत प्रभाव असलेले अहिर सेनावासी होताना त्यांनी आदित्य यांचे कौतुक केल्याने त्यांचा मतदारसंघाबाबत निर्णय झाल्याचे मानले जाते. वरळीत अहिर यांचा पराभव करणारे सेनानेते विद्यमान आमदार सुनील शिंदे मात्र या घडामोडींमुळे नाराज आहेत. मी पुन्हा वरळीतून लढेन याबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

मुंबई : निवडणूकीच्या राजकारणात उतरणारे पहिले ठाकरे होण्याचा मान आदित्य पटकावणार अशी शक्यता वर्तवली जाते आहे. ते वरळीतून लढणार की, शिवडीतून असा प्रश्न होता.

वरळीत प्रभाव असलेले अहिर सेनावासी होताना त्यांनी आदित्य यांचे कौतुक केल्याने त्यांचा मतदारसंघाबाबत निर्णय झाल्याचे मानले जाते. वरळीत अहिर यांचा पराभव करणारे सेनानेते विद्यमान आमदार सुनील शिंदे मात्र या घडामोडींमुळे नाराज आहेत. मी पुन्हा वरळीतून लढेन याबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

आज (ता. 25) सकाळीच राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे व आदित्या ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवबंधन बांधले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Theckeray possibility to contest assembly election from worli constituency