रस्त्यांसाठी आदित्यने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

मुंबई - पावसाळ्याच्या अगोदर मुंबईतले रस्ते पूर्ण होण्यात राज्य सरकारचा दगडखाणी बंदीचा निर्णय आडवा येत असल्याची तक्रार घेऊन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट बुधवारी घेतली. 

"वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्यासह ठाकरे यांनी ही भेट घेतली. नवी मुंबई व ठाणे परिसरातील दगड खाणी बंद आहेत. त्यामुळे, मुंबईतल्या रस्त्यांना खडीची मोठी समस्या भेडसावत असून रस्त्यांची कामे रखडली असल्याचे आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. पावसाळा सुरू होण्यास एक महिना अवकाश असताना रस्त्यांची कामे जलदगतीने पूर्ण व्हायला हवीत. अन्यथा ऐन पावसाळ्यात मुंबई महापालिका प्रशासनाला खराब व नादुरुस्त रस्त्यामुळे तारेवरची कसरत करावी लागेल. त्यामुळे, मुंबईकरांचा त्रास वाचवायचा असेल तर दगड खाणी सुरू करण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. यावर, मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्‍तांना तातडीने दूरध्वनी करत दगड खाणीसंदर्भात कायदेशीर तोडगा काढण्याचे निर्देश दिले. 

Web Title: Aditya took the road to visit the Chief Minister