पंतप्रधानांसाठी काढला गतिरोधक अन् झाला अपघात!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

मेट्रो प्रकल्प व इतर कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कल्याणमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे कल्याणमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर त्यांच्या सोयींसीठी रस्त्यावरील गतिरोधक काढून टाकण्यात आल्याने चारचाकीची सायकलस्वाराला धडक बसून अपघात झाला. 

कल्याण : मेट्रो प्रकल्प व इतर कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कल्याणमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे कल्याणमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर त्यांच्या सोयींसीठी रस्त्यावरील गतिरोधक काढून टाकण्यात आल्याने चारचाकीची सायकलस्वाराला धडक बसून अपघात झाला. 

या बंदोबस्तामुळे कल्याणमधील नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. बापगाव येथे पंतप्रधानांसाठी हेलिपॅड बनविण्यात आले आहे. यामुळे बापगाव ते फडके मैदान दरम्यानच्या रस्त्यावरील सर्व गतिरोधक काढण्यात आले होते. येथील गांधारी ब्रिजजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने 2 सायकस्वारांना धडक दिली यात सायकलस्वार गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या चारचाकीने दोन पोलिसांनाही धडक दिली. या धडकेत पोलिस किरकोळ जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

मोदी यांची सभा ज्या फडके मैदानावर होणार आहे तिथे जवळच लालचौकी स्मशानभूमी आहे. मात्र या स्मशानभूमीला आज टाळे ठोकण्यात आले आहे. मोदी यांची सभा दुपारी अडीच वाजता असून ते कल्याणच्या बाहेर जाईपर्यंत या स्मशानभूमित एकही अंत्यसंस्कार होणार नाही. तसेच या मैदानाच्या आवारात असलेल्या डंपिंग ग्राऊंडवर अत्तराचे फवारेही मारण्यात आले आहेत.

Web Title: adjustment made for PM Narendra Modi Kalyan visit led to an accident