esakal | Mumbai : बेस्ट चालक भाड्याने देण्याचा प्रशासनाचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

BEST WORKER

Mumbai : बेस्ट चालक भाड्याने देण्याचा प्रशासनाचा निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बेस्टने भाड्याने बसेस घेतल्याने पुर्णवेळ चालकांचे काम कमी झाले आहे.त्यामुळे त्यांना आता सरकारी आणि खासगी कंपन्यांची वाहाने चालविण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. मात्र, बेस्ट प्रशासनाच्या या निर्णयाला कामगार संघटनांनी विरोध केला आहे.

बेस्टच्या ताफ्यात सध्या 1 हजार 426 भाडेतत्वावरील बसेस आहेत.या बसेस चालविण्यासाठी कंत्राटदारांमार्फतच चालक पुरवले जात आहे. तर,बेस्टचे कायमस्वरुपी 9 हजारच्या आसपाच चालक असून त्यातील 1 हजार 200 चालकांना रोज कोणतीही ड्यूटी मिळत नाही. सध्या त्यांना इतर कामांना जुंपले जाते. यात, बेससे मार्ग बदलल्यास त्याबाबत माहिती देण्यासाठी रस्तांवर उभे राहाणे, डेपोत बसेसचे नियोजन करणे अशी कामे दिली जातात.‘रोज सुमारे 1 हजार 200 चालकांना बस चालविण्याचे काम मिळत नाही. मात्र, त्यांचे वेतन नियमीत दिले जात आहे.असा दावा प्रशासनाने केला.

तसेच, चालकांना वाहान चालविण्याचा सराव राहावा म्हणून त्यांना खासगी आणि सरकारी आस्थापानाची वाहाने चालविण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. बेस्ट प्रशासन आठ तासांच्या ड्यूटीसाठी कंपन्यांकडून 900 रुपयांचे शुल्क आकारणार आहे. यातून चालकांचाही सरावा राहील तसेच बेस्टलाही उत्पन्न मिळेल, असा हेतू असल्याचे सांगण्यात आले. बेस्ट प्रशासनाने बस गाड्या भाड्याने घेताना सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यात येणार नाही.असे स्पष्ट केले होते.मात्र,आता चालकांना काम नसल्याने त्यांना वेठबिगारीला जुंपणार आहे, असा आरोप केला जात आहे.

आंदोलनाचा इशारा

बेस्ट उपक्रमाच्या या निर्णया विरोधात कामगारांनी आंदोलनाची हाक दिली असून मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी परिवहन विभागाच्या प्रत्येक बस डेपोत निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात येणार असल्याचे बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे नेते शंशाक राव यांनी स्पष्ट केले आहे.या निर्णयाला बेस्ट एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नितीन पाटील यांनीही विरोध केला आहे.

loading image
go to top