अंबरनाथ नगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट  

अंबरनाथ नगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट  

अंबरनाथ : कोरोनाच्या संकटाचा फटका निवडणुकीलाही बसल्याने अंबरनाथ पालिका निवडणूक वेळेत होऊ शकली नाही. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेमध्ये सोमवारपासून प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. दरम्यान नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने मावळत्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी नगराध्यक्ष पदाच्या कालावधीत सहकार्य करणाऱ्यांचे आभार व्यक्त केले. 

अंबरनाथ नगरपालिकेतील लोकप्रतिनिधींचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने यावर्षी एप्रिल 2020 मध्ये नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार होती. मात्र कोरोना विषाणूचा जगभरासह देशात तसेच राज्यात पसरलेल्या फैलावाचा धोका लक्षात घेता निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोग आणि सरकारला घ्यावा लागला. निवडणुका होणार म्हणून यंदा नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून शहरात त्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेगही आला होता. 

सार्वत्रिक निवडणूक एप्रिलमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर नगराध्यक्ष पदाची निवडणूक देखील मे महिन्यामध्ये झाल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष पदभार स्वीकारतात. मात्र, कोरोनाचा पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे मागील महिन्यात सरकारने एका परिपत्रकाद्वारे 17 मे 2020 पासून नगरपालिकेवर उपविभागीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. उद्या 19 मे रोजी प्रांताधिकारी प्रशासक म्हणून अतिरिक्त पदभार स्वीकारणार असल्याचे समजते. 

दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत सर्वांच्या सहकार्यातून शहरात चांगले प्रकल्प मार्गी लावल्याचे सांगून मावळत्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com