महापालिका परिवहन समिती सदस्यांनी स्विकारले खेळाडुचे पालकत्व

संजीत वायंगणकर
मंगळवार, 20 मार्च 2018

डोंबिवली : क्षमता असताना देखील फक्त आर्थिक कारणाने एखाद्या हरहुन्नरी आंतरराष्ट्रीय डोंबिवलीकर खेळाडूने मागे पडू नये, या उद्देशाने मनसेचे परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी “किक बॉक्सिंग” खेळाडू अक्षय गायकवाडचे पालकत्व स्विकारुन डोंबिवलीच्या क्रिडा जगतात एक अनोखा पायंडा पाडला आहे.

डोंबिवली : क्षमता असताना देखील फक्त आर्थिक कारणाने एखाद्या हरहुन्नरी आंतरराष्ट्रीय डोंबिवलीकर खेळाडूने मागे पडू नये, या उद्देशाने मनसेचे परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी “किक बॉक्सिंग” खेळाडू अक्षय गायकवाडचे पालकत्व स्विकारुन डोंबिवलीच्या क्रिडा जगतात एक अनोखा पायंडा पाडला आहे.

परिस्थितीशी दोन हात करत  कुठल्याही क्षेत्रात स्वतःचा ठसा निर्माण करणे अशक्य असते. नावलौकिकाला यायचे असेल तर भक्कम पाठबळ पाहिजे तेव्हाच यशाचे शिखर सर करता येते. त्यामुळेच किक बॉक्सिंग खेळाडू अक्षय गायकवाड यास पुढील एक वर्षा करिता होणाऱ्या त्याच्या राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्पर्धेला येणाऱ्या खर्चाची आर्थिक मदत करणार असल्याचे मनसेचे महापालिका परिवहन समिती सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी सांगितले व त्याच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारल्याचे जाहीर करुन अक्षयला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पहिला धनादेश दिला.             

डोंबिवली पश्चिमेकडील गायकवाडवाडी येथील अक्षय बळीराम गायकवाड हा किक बॉक्सिंग खेळात प्राविण्य मिळवुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगीरी करण्यासाठी मेहनत घेत आहे. परंतु अक्षयची परिस्थिती बेताचीच असल्याने त्याला  योग्य मार्ग मिळत नव्हता. यातून मार्ग काढण्यासाठी आणि आर्थिक मदतीसाठी शहरातील अनेक ठिकाणी याचना केली पण नकारात्मक प्रतिसाद मिळत होता प्रल्हाद म्हात्रे यांना ही माहिती मिळताच व एका कार्यक्रमात अक्षयच्या सत्कार सोहळ्याचे साक्षीदार स्वतः प्रल्हाद म्हात्रे असल्याने त्यांनी निर्णय घेतला आणि किक बॉक्सिंगमध्ये करियर करू पाहणाऱ्या अक्षयचे वर्षभराचे पालकत्व स्वीकारले. म्हात्रे यांनी सांगितले की, तो मेहनती असून त्यांने त्याला झेपेल तेवढे प्रयत्न करावेत त्याचप्रमाणे अक्षयने कीक बॉक्सिंग स्पर्धेसाठी आपली शारीरिक क्षमता व आत्मविश्वास या जोरावर स्पर्धेत सहभागी व्हावे आणि आपले नावलौकिक कमवावे असा वडिलकीचा सल्लाही दिला.                                     

अक्षय गायकवाड याने “कीक बॉक्सिंग” स्पर्धेत अहमदनगर राज्यस्तरीय स्पर्धेत 2016 मध्ये कास्यपदक, दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक, आंतरराष्ट्रीय कीक बॉक्सिंग सेमिनार व राष्ट्रीय संघ निवडीमध्ये 2017 माध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. तसेच तुर्कमोनिस्तान येथे एशियन कीक बॉक्सिंग स्पर्धेत 2016-17 मध्ये कास्यपदक मिळविले आहे. त्याचे कल्याण खडकपाडा येथील मोहनप्लनेट मधील मोहनसिंग सर, बोमार्शल आर्ट क्लासमधील संजय कतोड यांच्याकडे कीक बॉक्सिंगचे आद्ययावत प्रशिक्षण सुरु आहे. 

Web Title: adopted player by the member of Municipal Transportation Committee