भेसळयुक्त 600 किलो पनीर जप्त ; महापालिकेसह एफडीएची कारवाई

भेसळयुक्त 600 किलो पनीर जप्त ; महापालिकेसह एफडीएची कारवाई

नवी मुंबई : भेसळ करून तयार केल्या जाणाऱ्या पनीरवर पशुवैद्यकीय विभाग आणि एफडीएने कारवाई करून ते जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई घणसोली येथे करण्यात आली. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा भांडाफोड झाला आहे.

महापालिका आणि एफडीएच्या कारवाईत तब्बल 600 किलो पनीर जप्त करण्यात आले. तर 600 लिटर दूध आणि पाम तेल नष्ट करण्यात आले आहे. घणसोली सेक्‍टर 25 येथील नमो फ्रोझन दुकानात भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ तयार केले जात असल्याची माहिती महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाला मिळाली होती; मात्र भेसळयुक्त पदार्थांवरील कारवाई असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाची मदत घेत संध्याकाळच्या सुमारास छापा मारण्यात आला. त्यादरम्यान पाम तेल आणि सनफ्लॉवर ऑइल दुधात भेसळ करून पनीर तयार करण्याचे काम सुरू होते.

दुधातील फॅट कमी करून तयार करण्यात आलेल्या स्किम मिल्क पावडरपासून दूध तयार करण्यात येत होते. नंतर भेसळयुक्त दुधात फॅट आणून पनीर तयार करण्यासाठी तेलाचा वापर केला जात होता. 

दूध डेअरीमधून विक्री 

या वेळी घटनास्थळी एफडीए आणि पालिकेच्या पथकांनी 600 लिटर दूध आणि तेल जागेवरच नष्ट केले. घटनास्थळावरून एफडीएने दूध, पनीर आणि तेलाचे नमुने तपासण्यासाठी घेतले आहेत.

या कारवाईत भेसळ करणाऱ्या कारागिरांची चौकशी केली असता तयार होणारे पनीर कामोठे, खारघर, सीवूड्‌स, पनवेल येथील दूध डेअरीमध्ये विक्री करत असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात पनीर विक्री करण्यात आलेल्या ठिकाणावरील दूध डेअरीवर छापे मारावे लागणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंझारे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com