बंदर व गोदी कामगारांना मिळणार आगाऊ बोनस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

मुंबई : भारतातील सर्व बंदर व गोदी कामगारांना केंद्र सरकारच्या नौकानयन मंत्रालयाने सध्या तात्पुरत्या स्वरूपात बोनस देण्याचे आदेश मंगळवारी (ता. 24) दिले. त्यानिमित्त मुंबई पोर्ट ट्रस्ट विश्वस्तांची नुकतीच बैठक झाली असून त्यामध्ये दसरा व दिवाळी सणासाठी 13 हजार रुपये आगाऊ बोनस मुंबई गोदी कामगारांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनीदेखील कामगारांना आगाऊ बोनस देण्याचे मान्य केले आहे. गेल्या वर्षी बंदर व गोदी कामगारांना 15 हजार 339 रुपये बोनस मिळाला होता. इंडियन पोर्ट असोसिएशनने बोनसची टक्केवारी जाहीर केल्यानंतर उरलेली बोनसची रक्कम नंतर देण्यात येईल. गोदी कामगारांना आगाऊ 13 हजार रुपये बोनस सप्टेंबरच्या पगाराबरोबर मिळेल, असे गोदी कामगारनेते व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज व केरसी पारेख यांनी सांगितले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Advance bonus for ports and dock workers