विकासकामांसाठी जाहिरातींचा आधार 

file photo
file photo


मुंबई ः विकासकामांसाठी जाहिरातींच्या माध्यमातून उत्पन्न मिळवता येते का, याचा विचार एमएमआरडीए करत आहे. असा महसूल मिळाल्यास विकासकामांचा दर्जा आणि वेग आणखी वाढवता येईल, असा विश्‍वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) मुंबई आणि लगतच्या परिसरात मेट्रो, उड्डाणपूल, आकाशमार्गिका (स्कायवॉक), ट्रान्सहार्बर योजना आदी कामांसाठी एमएमआरडीएला एक लाख कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे. या कामांसाठी केंद्र आणि राज्य सरकारसोबत देशी, विदेशी बॅंकाकडूनही एमएमआरडीएला अर्थसाह्य मिळाले आहे.

प्राधिकरणाने वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मोक्‍याची जागा सुमितोमो या जपानी कंपनीला 2238 कोटी रुपयांना विकली आहे. बीकेसीमधील आणखी दोन भूखंड विकण्यासाठी बोली लावण्यात आली, मात्र अपेक्षित प्रतिसाद लाभला नसल्याने हा व्यवहार अद्याप झालेला नाही.

या पार्श्‍वभूमीवर एमएमआरडीएने आता अधिक उत्पन्न मिळवण्याच्या हेतूने जाहिरातींसाठी जागा देण्याचा विचार चालवला आहे. मेट्रो स्थानके आणि महामार्गांवरील दोन्ही बाजूंना मोक्‍याच्या जागांवर जाहिरातींचे फलक उभारून उत्पन्न मिळवता येईल का, याची चाचपणी एमएमआरडीए करत आहे. या कमाईचा विनियोग विविध प्रकल्पांसाठी करण्याचा प्राधिकरणाचा विचार आहे. 

कमाईची ठिकाणे 
मेट्रो स्थानके, महामार्गांवरील दोन्ही बाजूंच्या जमिनी, स्कायवॉक, उड्डाणपूल आदी ठिकाणी जाहिराती झळकवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. सोबत वाहनतळ, फूडकोर्ट, रेस्टॉरंट, कार्यालये, प्रदर्शन केंद्र, मोबाईल टॉवर यांसाठी भाडेतत्त्वावर जागा देण्याचाही विचार आहे. पुलांच्या खांबांवरही जाहिरात करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com