उल्हासनगर न्यायालयात वकिलांचे कामबंद आंदोलन

दिनेश गोगी
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

उल्हासनगर - काल सोमवारी उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणारे ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ आज उल्हासनगर न्यायालयात वकिलांनी कामबंद आंदोलन केले.

उल्हासनगर - काल सोमवारी उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणारे ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ आज उल्हासनगर न्यायालयात वकिलांनी कामबंद आंदोलन केले.

उल्हासनगर तालुका बार ऍडव्होकेट फाऊंडेशनचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ऍड.धम्मपाल तिडके, उमेश केदार, शशी इंगळे, अमोल भांदुर्गे, जय गायकवाड, कल्पेश माने, राहुल बनकर, करण खरात, मारुती ढेरे, प्रकाश खाडे, सत्यन पिल्ले, संदीप पगारे, शशी इंगळे, अजय खाडे, उज्वल गवई, आकाश वाघोले, अरुण शिंदे, अरुण जाधव, अनिल जाधव, दीपक मिश्रा, गिरीश लालचंदनी, रवी जायसिंघनी, प्रभा भामरे, जय, सुमित गेमनानी आदी वकील या आंदोलनात सहभागी झाले होते. 

या आंदोलनामुळे न्यायालयाचे कामकाज ठप्प पडल्याने आज होणाऱ्या खटल्यांची तारीख पुढे देण्यात आली. मराठा आरक्षण ही कायदेशीर लढाई असल्याने कुणीही कायदा हातात घेऊन पोलिस व वकिलांवर हल्ला करू नये. पोलिस - वकील हे न्यायप्रणालीचे अंग असून त्यांना सहकार्य करा, अडथळा आणू नका असे आवाहन ऍड.जय गायकवाड यांनी केले.

Web Title: Advocates 'kamband' movement in Ulhasnagar court