कायदा विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी वकिलांची मदत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

मुंबई - कायदा विषयांच्या हिवाळी परीक्षांच्या निकालांतील गोंधळ कायम आहे. या निकालांबाबत चालढकल करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाला बुधवारी (ता. 11) स्टुडण्ट लॉ कौन्सिल या विद्यार्थी संघटनेने धारेवर धरले. त्यानंतर आठवडाभरात निकाल जाहीर करण्याचे आश्‍वासन प्रशासनाकडून देण्यात आले. निकाल वेळेवर लावण्यासाठी विद्यापीठ पुन्हा वकिलांची मदत घेण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. 

मुंबई - कायदा विषयांच्या हिवाळी परीक्षांच्या निकालांतील गोंधळ कायम आहे. या निकालांबाबत चालढकल करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाला बुधवारी (ता. 11) स्टुडण्ट लॉ कौन्सिल या विद्यार्थी संघटनेने धारेवर धरले. त्यानंतर आठवडाभरात निकाल जाहीर करण्याचे आश्‍वासन प्रशासनाकडून देण्यात आले. निकाल वेळेवर लावण्यासाठी विद्यापीठ पुन्हा वकिलांची मदत घेण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. 

प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या उपस्थितीत विद्यापीठ प्रशासन आणि स्टुडण्ट लॉ कौन्सिल यांची प्रलंबित निकालांबाबत बैठक झाली. या बैठकीला प्रभारी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे, कायदा शाखेच्या विभागप्रमुख डॉ. रश्‍मी ओझादेखील उपस्थित होत्या. बैठकीत अद्याप 23 हजार 67 हजार उत्तरपत्रिका तपासणे शिल्लक आहे, अशी कबुलीही या वेळी देण्यात आली. उत्तरपत्रिका तपासणीसाठी बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या पाच वर्षांचा अनुभव असलेल्या वकिलांना उत्तरपत्रिका तपासणीसाठी बोलावले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या एप्रिल महिन्याच्या निकालासाठीही वकिलांची मदत घेतली गेली होती. हिवाळी परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतरच उन्हाळी परीक्षा होतील, असे सांगून नियमित परीक्षांनंतरच एटीकेटी परीक्षा घेतल्या जातील, असे सांगण्यात आले. 

कायदा विषयाच्या सत्र दोन, चार, सहाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे जाहीर केल्यानंतरच एक, तीन, पाचच्या सत्र एटीकेटीच्या परीक्षा घेण्याची स्टुडण्ट लॉ कौन्सिलची मागणी विद्यापीठाने मान्य केली; परंतु विद्यार्थ्यांचा त्रास लक्षात घेत विद्यापीठावर कारवाई करण्यासाठी पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. 

पुनर्मूल्यांकनात  30 टक्के विद्यार्थी पास 
गतवर्षीच्या उन्हाळी परीक्षांच्या निकालातील गोंधळ हिवाळी परीक्षांतही कायम आहे. उन्हाळी परीक्षांच्या पुनर्मूल्यांकनाच्या निकालांत 30 टक्के विद्यार्थी पास झाले होते, अशी धक्कादायक माहिती स्टुडण्ट लॉ कौन्सिलने बैठकीत दिली. माहिती अधिकारातून ही माहिती उघड करून कौन्सिलने विद्यापीठाच्या ऑनस्क्रीन असेसमेंट प्रयोगाचे पितळ उघडे पाडले. 

कला, विज्ञान शाखेच्या  तृतीय वर्ष परीक्षा आजपासून 
तृतीय वर्ष कला शाखा आणि विज्ञान शाखेच्या परीक्षेला गुरुवारपासून (ता. 11) सुरुवात होणार आहे. या परीक्षांना 35 हजार 715 विद्यार्थी बसणार आहेत. तब्बल 320 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. राज्याबाहेरील सिल्व्हासा या केंद्रशासित प्रदेशातही एक परीक्षा केंद्र असेल.

Web Title: Advocates support for law-abatement of papers