"बबड्याच्या हट्टापायी" या ट्विटनंतर रोहित पवारांचं आशिष शेलार यांना जशास तसं उत्तर

सुमित बागुल
Saturday, 29 August 2020

'आमची परीक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती'

मुंबई : काल माननीय सुप्रीम कोर्टाने अंतिम वर्षाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत सुनावणी केली. यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलंय की विना परीक्षा कुणालाही पदवी दिली जाऊ शकत नाही. त्यामुळे राज्य शासनाला तारखा पुढे गेल्यात तरीही परीक्षा घेणं मात्र बंधनकारक राहील.

या निकालानंतर भाजपने सरकारवर निशाणा साधलाय. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी काल ट्विटरवरून सरकारवर निशाणा साधला. "एका "बबड्याच्या" हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला.. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला... आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार...! ऐकतो कोण? मा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला!", असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं होतं.

मोठी बातमी - घरी विलगीकरणात आहात? BMC ने तुम्हाला उपलब्ध करुन दिलीये 'ही' विशेष सुविधा
 

यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते आशिष शेलार यांना जशास तसं उत्तर दिलं आहे

'आमची परीक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती आणि राहील. बबड्याची सीरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही हे पटलं असतं. आता त्यासाठी किमान स्वत:च्या ट्वीटखालील रिप्लाय तरी वाचाल,' असा टोला रोहित यांनी शेलारांना लगावलाय.

मोठी बातमी -  तुमच्या, आमच्या बँकांच्या EMI बद्दलची महत्त्वाची बातमी

महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुरवातीपासूनच कोरोनामुळे परीक्षा घेता येणार नाहीत असं सांगितलं जात होतं. मात्र UGC ची भूमिका परीक्षा घायला हव्यात अशीच होती. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात याप्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली होती.यावर कोर्टाने काल निकाल दिलाय. विना परीक्षा विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करता येणार नाही, अशी स्पष्ट मत सुप्रीम कोर्टाने नोंदवलं आहे.

after ashish shelars tweet targeting maharashtra government rohit pawar replies shelar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after ashish shelars tweet targeting maharashtra government rohit pawar replies shelar