बेस्टनंतर मुंबई पालिकेचा संप?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

मुंबई - बेस्टच्या नऊ दिवसांच्या ऐतिहासिक संपानंतर आता कामगार नेते शशांक राव यांनी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संपाचे संकेत दिले आहेत. कामगारांचा गेल्या पाच वर्षांपासून वेतन करार झालेला नाही. हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राव यांच्या संघटनेने आता पालिकेच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. संप करावा की नाही, यासाठी येत्या फेब्रुवारीत मतदान घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेले नऊ दिवस संप सुरू होता. न्यायालयाच्या आदेशाने हा संप मागे घेण्यात आला असला तरी कामगारांच्या मागण्यांबाबत यश आले आहे. यामुळे राव यांच्या कामगार संघटनेला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आहे.

पालिकेत शरद राव यांची म्युनिसिपल कामगार युनियन ही मान्यता प्राप्त कामगार संघटना होती. या संघटनेतून शशांक राव यांची हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर त्यांनी आपली स्वतःची संघटना स्थापन केली. त्याचवेळी बेस्टची संघटना आपल्या ताब्यात असल्याचा फायदा घेत राव यांनी बेस्टचा संप यशस्वी केला. 

पाच वर्षांपासून वेतन करार नाही
कामगार नेते दिवंगत शरद राव यांच्या निधनानंतर दोन-अडीच वर्षानंतर पहिल्यांदाच त्यांचे पुत्र राव यांना मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे कामगार संघटनांमध्ये त्यांचे वर्चस्व वाढले आहे. पालिका कर्मचाऱ्यांना पाच वर्षांपासून वेतन करार मिळालेला नाही. या प्रश्‍नाची तड लावण्यासाठी राव यांनी पालिका संपाचे संकेत दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुढील महिन्यात पालिका कर्मचाऱ्यांचे मतदान घेतले जाणार असल्याचे समजते.

Web Title: After the best, the municipal corporation employees have indicated the strike for the demands