प्रेयसीने संबंध तोडल्याने पॉर्नसाइटवर चित्रफीत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

मुंबई - मुंबईतील प्रसिद्ध दंत महाविद्यालयाच्या नावाने पॉर्नसाइटवर नग्न चित्रफीत अपलोड करणाऱ्या तरुणाला सायबर पोलिसांनी पुण्यातून अटक केली. महाविद्यालय प्रशासनाच्या तक्रारीनंतर याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 

विजय राठोड (वय 26) असे या आरोपीचे नाव असून, तो मूळचा नांदेड येथील आहे. प्रेयसीने त्याच्यासोबतचे संबंध तोडून दुसऱ्याशी लग्न केल्यामुळे त्याने तिची चित्रफीत या पॉर्नसाइटवर अपलोड केली होती, असे उघड झाले आहे. त्याच्याविरोधात भादंवि कलम 500 व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायदा कलम 67 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. 

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात या महाविद्यालयातील एका वरिष्ठ डॉक्‍टरला त्याच्या सहकारी डॉक्‍टरने महाविद्यालयाच्या नावाने पॉर्नसाइटवर एक अश्‍लील चित्रफीत अपलोड करण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर महाविद्यालयाच्या नावाने आणखी एक चित्रफीत अपलोड झाल्याचे समजले. या माहितीनंतर रुग्णालय प्रशासनाकडून सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. सायबर पोलिसांनी प्रथम या तरुणीचा शोध लावला. त्या वेळी आरोपीने इतर सोशल नेटवर्किंग साइटवरही तरुणीची चित्रफीत अपलोड केल्याचे समजले. या माहितीवरून सायबर पोलिसांनी सापळा रचून विजयला पुण्यातून अटक केली. या तरुणीला धडा शिकवण्यासाठी आरोपीने हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. 

Web Title: After breaking the relationship, the video on pornite