सुशांत सिंह प्रकरणः काँग्रेसच्या आरोपानंतर भाजप आक्रमक, थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

पूजा विचारे
Monday, 31 August 2020

काँग्रेसनं भाजपवर आरोप केले. त्यानंतर आता भाजपनं काँग्रेसवर पलटवार केला आहे. यावेळी भाजपनं ठाकरे सरकारवरही निशाणा साधला आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या संदर्भात एक पत्र लिहिलं आहे.

मुंबईः  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहेत. या प्रकरणाच्या तपासासोबत राज्यातलं राजकारणही तापलं आहे. या प्रकरणी राजकीय आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहेत. याआधी काँग्रेसनं भाजपवर आरोप केले. त्यानंतर आता भाजपनं काँग्रेसवर पलटवार केला आहे. यावेळी भाजपनं ठाकरे सरकारवरही निशाणा साधला आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या संदर्भात एक पत्र लिहिलं आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांवर कशा प्रकारे दबाव टाकला जात होता आणि कोणाकडून टाकला जात होता, याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. सीबीआयला ही माहिती देण्याची आमची तयारी असल्याचं भातखळकर यांनी म्हटलं आहे. 

 

सुशांत मृत्यू प्रकरणात बॉलीवूड, ड्रग्स आणि राजकारणी यांचे संबंध रोज उघड होत आहेत. हे संबंध दडपण्याचा राज्य सरकारमधील गृह विभागातील कोणत्या शक्तीने प्रयत्न केला? बॉलिवूडच्या या अभिनेत्याला बोलवा किंवा बोलवू नये, तसंच त्याचं कसं स्टेटमेंट घ्यावं अशा सूचना देणारा मंत्री कोण? या सगळ्या प्रकरणांची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही अतुल भातखळकर यांनी पत्रात केली आहे.

हेही वाचाः  सबसे हटके! राज ठाकरेंच्या 'या' फोटोची सोशल मीडियावर धूम, बघा फोटो

सुशांतसिंह यांचा मृत्यू ही एक आत्महत्या आहे, असं दर्शवणारी वक्तव्ये व ट्वीट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

संदीप सिंहची चौकशी होण्याची शक्यता, गृहमंत्र्यांची माहिती

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बायोपिक बनवणारे चित्रपट निर्माते संदीप सिंगबद्दल तक्रारी आल्या आहेत.  या तक्रारी ड्रग्स कनेक्शन संबंधित आहेत. दरम्यान सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयकडे या तक्रारी पाठवणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे.

अधिक वाचाः  महाविकास आघाडीचा वाद 'तीन हात नाक्या'वर, काँग्रेसच्या बॅनरमुळे राजकीय खळबळ

संदीप सिंह ज्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर २७ वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट नमो बनवला. मला गेल्या दोन दिवसांपासून संदीप सिंह याचं भाजप आणि ड्रग्स कनेक्शनशी काय संबंध आहे. याविषयी चौकशी करावी, अशी मागणी मला गेल्या दोन दिवसांपासून करण्यात येत असल्याचंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. मी या तक्रारी सीबीआयकडे पाठवत आहे, जे सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे, असे देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. 

हेही वाचाः  घंटानाद आंदोलनाची छायाचित्रे पाहिल्यावर समजलं की...शिवसेनेचा भाजपला चिमटा

काँग्रेसचा आरोप 

सुशांतच्या मृत्यू प्रकरणी ड्रग्स कनेक्शनसंदर्भात संदीप सिंह चौकशीच्या रडारवर असताना तो लंडनला पळून जाऊ शकतो असे मीडिया रिपोर्ट येत आहेत. ड्रग्स डिलींगशी संदीप सिंहचे नाव जोडले गेल्यानं भाजपशी त्याचे असलेले घनिष्ठ संबंध पाहता ड्रग्स माफियांशी भाजपचा काही संबंध आहे का, याची चौकशी झाली पाहिजे. यात सत्य समोर आल्यास भाजपला तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही. संदीपनं  १ सप्टेंबर ते २३ डिसेंबर २०१९ या काळात महाराष्ट्र भाजपच्या कार्यालयात ५३ वेळा फोन केले. तो भाजप कार्यालयात कोणाशी बोलत होता? भाजपमधील संदिप सिंहचा ‘हँडलर’ कोण आहे ? असे गंभीर सवाल सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

After Congress Allegations bjp mla atul bhatkhalkar writes letter amit shah sushant case


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Congress Allegations bjp mla atul bhatkhalkar writes letter amit shah sushant case