esakal | हैद्राबादनंतर आता मुंबई महापालिकेवरही भाजपचाच भगवा फडकणार : राम कदम
sakal

बोलून बातमी शोधा

हैद्राबादनंतर आता मुंबई महापालिकेवरही भाजपचाच भगवा फडकणार : राम कदम

हैद्राबादमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर मुंबई महापालिकेवर देखील भाजपचा झेंडा फडकावणार असा दृढ विश्वास भारतीय जनता पक्षाचे नेते राम कदम यांनी व्यक्त केलाय.  

हैद्राबादनंतर आता मुंबई महापालिकेवरही भाजपचाच भगवा फडकणार : राम कदम

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : हैद्राबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत. या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. एकूण १५० जागांच्या महापालिकेत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. हैद्राबादमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर मुंबई महापालिकेवर देखील भाजपचा झेंडा फडकावणार असा दृढ विश्वास भारतीय जनता पक्षाचे नेते राम कदम यांनी व्यक्त केलाय.  

हैद्राबाद निकालानंतर राम कदम यांनी काही ट्विट केले आहेत, यामध्ये राम कदमांनी मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवाच फडकावणार असा विश्वास व्यक्त केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाला बिहारमध्ये यश मिळालं, हैद्राबादमध्ये देखील भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेवर देखील भाजपाचा भगवा फडकणार असल्याचं ट्विट राम कदम यांनी केलंय.

महत्त्वाची बातमी : मराठा आरक्षण : ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर

राम कदम यांनी शिवसेनेवर देखील कडाडून टीका केली आहे. शिवसेनेच्या ३० वर्षांच्या भ्रष्टाचारामुळे मुंबईतील नागरिक त्रस्त झाले आहेत. कोरोना काळात प्रशासनाकडून जी बेपरवाई केली गेलीये ती नागरिक अजूनही विसरलेले नाहीत. आम्हाला BMC वर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकणारच याचा विश्वास आहे.    

मुंबईतील  सर्व महत्त्वाच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा । Marathi News From Mumbai

महत्त्वाची बातमी : कोरोना लस साठवणूकीसाठी मुंबई महापालिका सज्ज; महापौरांकडून कांजुरमार्गच्या जागेची पाहणी

दरम्यान, राम कदम यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर देखील निशाणा साधलाय. शरद पवारांना काँग्रेससोबत काम करण्याचा अनुभव आहे. शरद पवार यांनी आपल्या अनुभवाच्या आधारावर राहुल गांधी यांच्यावर टीका केली. मात्र राज्यात त्यांच्याच सोबत राज्य देखील चालवतायत असं देखील राम कदम म्हणाले आहेत.  

after Hyderabad corporation results BJP will win 2022 BMC election results

loading image