ठाण्यातील लॉकडाऊन बाबत आली 'मोठी' बातमी, 'इतक्या' दिवसांसाठी वाढला ठाण्यातील लॉकडाऊन

सुमित बागुल
शुक्रवार, 10 जुलै 2020

मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे शहरात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येतायत.

मुंबई : मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे शहरात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येतायत. खरंतर मिशन बिगिन अंतर्गत लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमधील शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागलेत. यामध्ये ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर आदींचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर सदर सर्व महापालिका आयुक्तांनी दहा दिवसांचा लॉकडाऊन घेण्याचा निर्णय घेतला.

पुण्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता आहे. तिथेही दहा दिवसांचा लॉकडाऊन घेतला जाणार आहे. मुंबई आणि नजीकच्या महापालिकांमधील वाढत कोरोना प्रादुर्भाव पाहता आता ठाणे महापालिका क्षेत्रात आणखी एक आठवडा लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. 

बापरे ! भाजपच्या 'या' खासदाराला कोरोनाची लागण, घरातील एकूण ८ जणही आहेत पॉझिटिव्ह

खरंतर दिनांक २ जुलै ते १२ जुलै पर्यंत दहा दिवसांचा लॉकडाऊन घेण्याचा निर्णय या आधीच झालाय. मात्र ठाणे महापालिका हद्दीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ठाण्यातील लॉकडाऊन १९ जुलै २०२० सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाढवण्यात आलाय. ठाणे महापालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी याबाबतचे आदेश जारी केलेत.    

त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. कोरोनाचा  वाढता प्रभाव बघता लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे  अत्यावश्यक सेवा आणि घरकाम करणाऱ्यांना या लॉकडाऊन मधून वगळण्यात आलंय.  

मोठी बातमी - असा हवेतूनही पसरू शकतो कोरोना, WHO ने जारी केली नवीन नियमावली

खासदार कपिल पाटील आणि घरातील एकूण ८ जण कोरोना बाधित

ठाण्यानजीकच्या भिवंडी लोकसभा मतदार संघातील खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण झालीये. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी आणि एकूण आठ जणांना कोरोनाची लागण झालीये. कपिल पाटील यांच्या पत्नी यांना सर्वप्रथम कोरोनाची लागण झाली. त्यानंतर स्वतः कपिल पाटील, त्यांचा मुलगा, सून आणि मुलीसोबत एक पुतण्या आणि दोन सुना अशा एकूण आठ जणांना कोरोनाची लागण झालीये. कपिल पाटील यांना सौम्य लक्षणं असल्याने ते त्यांच्या राहत्या घरीच होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांवर देखील कोरोना उपचार सुरु झालेत. 

after implementing lockdown in pune thane municipal corporation extends their lockdown till 19th july


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after implementing lockdown in pune thane municipal corporation extends their lockdown till 19th july