कर्नाटकनंतर गोवा, मणिपूरमध्येही काँग्रेस करणार सत्ता स्थापनेचा दावा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 मे 2018

भाजपचे बी. एस. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाची काल (गुरुवार) शपथ दिली. त्यानंतर काँग्रेसने आता गोवा आणि मणिपूरमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे सांगितले. 

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर राज्यपाल वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण देत भाजपचे बी. एस. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाची काल (गुरुवार) शपथ दिली. त्यानंतर काँग्रेसने आता गोवा आणि मणिपूरमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे सांगितले.  

गोवा काँग्रेसच्या आमदारांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची आज (शुक्रवार) भेट घेतली. त्यादरम्यान त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. काँग्रेसने दावा केला, की 2017 च्या विधानसभा निवडणुकीत 40 पैकी 17 आमदार मिळाल्याने गोव्यात काँग्रेस मोठा पक्ष ठरला आहे. याबाबत गोवा काँग्रेसने ट्विट केले, की गोवा काँग्रेसच्या आमदारांनी राज्यपाल सिन्हा यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.

Goa assembly

कर्नाटकात भाजपला 104 जागांवर विजय मिळाला असून, राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानुसार राज्यपालांनी भाजपला पहिल्यांदा सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले.

राज्यपालांच्या या निर्णयानुसारच गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेस मोठा पक्ष ठरला असतानाही या राज्यांमध्ये काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण देण्यात आले नाही. त्यामुळे काँग्रेस आता या दोन्ही राज्यात राज्यपालांच्या निर्णयावर लक्ष ठेऊन आहे. 

Web Title: After Karnataka in Goa Manipur also claimed that Congress will form the government