मनसेच्या आरोपानंतर भाजपकडून मुंबईच्या महापौरांवर गंभीर आरोप

समीर सुर्वे | Tuesday, 1 September 2020

मुंबईच्या महापौरांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या मुलाच्या कंपनीला काम दिले असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता. भाजपनं देखील याच संदर्भात नवा खुलासा करत महापौरांवर गंभीर आरोप केलेत. 

मुंबईः गेल्या महिन्यात मनसे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप केला. मुंबईतील कोविड सेंटरचे काम देण्यात मुंबईच्या महापौरांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या मुलाच्या कंपनीला काम दिले असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता. वरळी आणि इतर जम्बो कोविड सेंटरमध्ये लेबर सप्लायचे काम किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया या कंपनीला देण्यात आले.  त्यांचा यामध्ये पूर्वीच्या कामाचा अनुभव तपासला गेला का? कारण या कंपनीच्या ऍडशिनल डिरेक्टर म्हणून महापौरांचे चिरंजीव साईप्रसाद पेडणेकर असल्याचं मनसेने समोर आणलं होतं. त्यानंतर आता भाजपनं देखील याच संदर्भात नवा खुलासा करत महापौरांवर गंभीर आरोप केलेत. 

किशोरी पेडणेकर यांच्या पुत्रा संबंधित असलेली कंपनी आता नव्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. किश कॉर्पोरेट सव्हिसेस या कंपनीची नोंदणी ज्या पत्त्यावर आहे त्याच पत्त्यावर इतर आठ कंपन्यांची नोंदणी असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. या सर्व कंपन्या बोगस असण्याची शक्यता असून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

हेही वाचाः  मन सुन्न करून टाकणाऱ्या क्रॉफर्ड मार्केट हिट अँड रन दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नोंद गोमती जनता सोसायटी, जी के कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०००१३ या पत्त्यावर आहे.या कंपनीत महापौर पुत्र संचालक असून याच कंपनीला वरळी येथील कोविड केंद्रासाठी मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट मिळाले आहे.

अधिक वाचाः  आदित्यसाठी शिवसेनेनं काँग्रेसवाल्यांना पगारावर ठेवलंय; काँग्रेसच्या आरोपानंतर भाजप नेता संतापला

याच पत्यावर इतर आठ कंपन्यांची नोंदणी करण्यात आली आहे. या सर्व बोगस कंपन्या असण्याची शक्यता असल्याचा दावा सोमय्या यांनी केला. या प्रकरणी राज्य सरकारकडे तक्रार केली असून या संदर्भातील मालकी हक्क आर्थिक हितसंबंध, व्यवहारातील पारदर्शकता याबाबत खुलासे व्हायला हवे असेही सोमय्या यांनी सांगितलं.

मनसेनंही केला होता आरोप 

मुंबईतील कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांनी स्वत:च्या मुलाला मिळवून दिल्याचा गंभीर आरोप मनसेनं महापौरांवर केला होता.  वरळी आणि इतर जम्बो कोविड सेंटरमध्ये लेबर सप्लायचे काम किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया या कंपनीला देण्यात आले.  त्यांचा यामध्ये पूर्वीच्या कामाचा अनुभव तपासला गेला का? कारण या कंपनीच्या ऍडशिनल डिरेक्टर म्हणून महापौरांचे चिरंजीव साईप्रसाद पेडणेकर असल्याचं मनसेने समोर आणलं होतं. इतरांना ही टेंडर का मिळाली नाही, कोविड इमर्जन्सी आणि इ टेडरिंगच्या नावाखाली हा घोटाळा बीएमसीकडून करण्यात आला असल्याचंही मनसेनं म्हटलं होतं. मनसेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले होते.

(संपादनः पूजा विचारे)

after MNS BJP makes serious allegations against Mumbai mayor Kishori Pednekar