मुकेश अंबानींपाठोपाठ 'हे' आहेत भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

मुंबई : डी-मार्ट चे संस्थापक राधाकृष्ण दमानी हे देशातले दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. मुकेश अंबानी यांच्यानंतर दमानी यांनी श्रीमंतांच्या यादीत स्थान दुसरं स्थान मिळवलं आहे. शिव नाडर, गौतम अदानी यांना मागेटाकत दमानी यांनी हे स्थान मिळवलं आहे. फोर्ब्स रियल टाईम बिलिनियरीज इंडेक्सनुसार गेल्या आठवड्यात 'एव्हेन्यू सुपरमार्केट'चे शेअर ५  टक्क्यांनी वाढले त्यामुळे दमानी यांच्या संपत्तीत वाढ झालीये. राधाकृष्ण दमानी यांची एकूण संपत्ती १७.५ अरब डॉलर म्हणजेच तब्बल १ लाख २५ हजार कोटी रुपये इतकी आहे.

मोठी बातमी -  आता पेट्रोल पंपावरच विकत घ्या नवी कोरी कार, कशी ? वाचा बातमी...

कोण आहेत राधाकृष्ण दमानी:

Image may contain: 1 person

मोठी बातमी - तब्बल ५९ वर्षानंतर येणार 'हा' योग; यंदाची महाशिवरात्र असणार विशेष...

शेअर बाजारातील एक प्रसिद्ध नाव आणि गुंतवणूकदार अशी राधाकृष्ण दमानी यांची ओळख आहे. त्यांनी २००२ साली मुंबईमध्ये व्यवसाय सुरू केला होता. मार्च  मध्ये २०१७ मध्ये 'एव्हेन्यू सुपरमार्केट'चा आयपीओ आल्यानंतर त्यांना रिटेल किंग म्हटलं जाऊ लागलं. राधाकृष्ण दमानी नेहमी पांढरा शर्ट आणि पांढरी पँट घालतात यामुळे त्यांची ही ओळख झाली आहे. म्हणूनच त्यांना मिस्टर व्हाईट अँड व्हाईट म्हणून ओळखलं जातं. त्यांनी त्यांच्या व्यवहारी ज्ञानाच्या जोरावर D-Mart ही  देशातील यशस्वी रिटेल चेन चालवली. याशिवाय त्यांनी तंबाखू आणि बिअरचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्यांचे शेअर्स विकत घेतले आहेत. अलीबागच्या 156 खोल्यांच्या ब्लु रिसॉर्टचे ते मालक आहेत. दमानी हे माध्यमांपासून अलिप्त असतात ते सोशल मीडियावरही फारसे अॅक्टिव्ह नसतात. त्यामुळे एक साधा व्यक्ति म्हणून त्यांची ओळख आहे.

मोठी बातमी - धक्कादायक ! मुलीच्या दागिन्यांनी घेतला आईचा जीव...

कोण आहेत टॉप ५ श्रीमंत व्यक्ती :  

१) मुकेश अंबानी -- ५७.४ अरब डॉलर
२) राधाकृष्ण दमानी-- १७.५ अरब डॉलर
३) श‍िव नाडर --16.4 अरब डॉलर
४) उदय कोटक--15 अरब डॉलर
५) गौतम अदानी --13.9 अरब डॉलर

after mukesh ambani this is second richest man of india check who is he 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after mukesh ambani this is second richest man of india check who is he