NCBनं समन्स बजावल्यावर रियानं कोणाला दिली धमकी, वाचा सविस्तर

पूजा विचारे
Sunday, 6 September 2020

भावानंतर आपल्यालाही अटक होण्याची चाहूल लागल्यानंतर रियानं आपल्या गॉडफादरला एक मॅसेज पाठवल्याचं समजतंय.

मुंबईः अभिनेत्री रिया चक्रवर्तीला समन्स बजावलं आहे. आज सकाळी १०.३० वाजेपर्यंत रियाला हजर राहण्यास सांगितलं आहे. एनसीबीची टीम मुंबई पोलिसांसह कथित आरोपी रियाच्या घरी दाखल झाली आहे. यावेळीच एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी रियाला समन्स बजावलं आहे.  अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात उघड झालेल्या ड्रग्स कनेक्शनबाबत नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (एनसीबी) आपला तपास वेगानं सुरु केला आहे. रियाला समन्स बजावण्यापूर्वी या प्रकरणी एनसीबीनं रियाचा भाऊ शौविकला अटक केली. 

शौविकनंतर रियाला ही अटक होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता भावानंतर आपल्यालाही अटक होण्याची चाहूल लागल्यानंतर रियानं आपल्या गॉडफादरला एक मॅसेज पाठवल्याचं समजतंय. रियाला समन्स बजावल्यानंतर रियानंही आपल्या हालचाली सुरु केल्या. रिया अटकेपासून आपला बचाव करत आहे. रियानं आपल्या गॉडफादरला मॅसेज दिला आहे. हा मॅसेज दिला स्मिता पारीखनं.  सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी स्मिता पारीख ही झटणारी कार्यकर्ती आहे.

 

जस्टिस फॉर सुशांतची जागा आता जस्टिस फॉर मीनं घेतली. स्मिता पारीख आणि रियामध्ये सध्या व्हॉट्सअॅपवरुन संभाषण होत आहे. यातून रियानं तिच्या माध्यमातून एक मॅसेज दिल्याचं समजतंय. 

जर मला अटक झाली तर मी तर अडकेनच  पण तुम्हाला सर्वांनाही मी अडकवेन असा इशाराचं रियानं आपल्या गॉडफादरला दिला आहे. रिया आज एनसीबीच्या कार्यालयात साडे दहा वाजेपर्यंत हजर राहणार आहे. त्यामुळे तिला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. 

 

याआधी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा मॅनेजर राहिलेला सॅम्युअल मिरांडा या दोघांना एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. या दोघांनाही किल्ला कोर्टानं 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. तर ड्रग्ज पेडलर कैजानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी असेल. 

 रियाची, शौविक, सॅम्युअल मिरांडाला समोरासमार बसवून चौकशी होण्याची शक्यता आहे. ड्रग्स कोणी कोणासाठी खरेदी केलं आणि त्यासाठी पैसे कोण देत होते? याचा शोध या चौकशीदरम्यान घेतला जाईल.

After NCB issued summon Rhea Send threatens message for godfather


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After NCB issued summon Rhea Send threatens message for godfather