पालकांच्या तक्रारीनंतर प्लास्टिक वापरणाऱ्या कॅन्टींनवर कारवायी

दीपक घरत
शनिवार, 23 जून 2018

पनवेल : राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावनीला शनिवारपासुन सुरुवात झाली. पनवेल महापालिकेत पहिल्यापासुनच प्लास्टीक पिशवी वापराला बंदी होती. राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या कायद्यानुसार बंदी घातलेल्या प्लास्टिक विरोधातील कारवायी दरम्यान खारघर मधिल डिएव्ही शाळेतील कॅन्टीनमधे वापरल्या जात असलेल्या प्लास्टिक डिश व चमचे जप्त करत पाच हजाराचा दंड वसुल केला.

खारघर येथील डिएव्हि पब्लिक स्कुल मधील कॅन्टीनमध्ये शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वापर होत असल्याची तक्रार पालीका उपआयुक्त जमिर लेंगरेकर यांना एका पालकाने व्हॉट्सअॅपद्वारे दिली. व्हाट्सअॅपवर आलेल्या तक्रारीची दखल घेत पालीकेच्या पथकाने शाळेच्या कॅन्टीनची पाहणी केली असता कॅन्टीनमध्ये शासनाने बंदी घातलेले प्लास्टिक पासून बनलेले चमचे व प्लेट्स वापरले जात असल्याचे लक्षात आले. त्यामुळे सर्व सामान जप्त करण्यात आले असून, कॅन्टींन चालकाला पाच हजाराचा दंड ठोटावण्यात आला असल्याची माहीती उपआयुक्त लेंगरेकर यांनी दिली.

छोट्या व्यावसायीकांनकडुण प्लास्टिकचा वापर

18 मार्चपासून राज्यात सर्व प्रकारची पूर्ण प्लास्टिक बंदी लागु केली आहे. मोठ्या व्यापाऱ्यांनी प्लास्टीक देणे बंद केले असले तरी छोटे व्यावसायीक, हाथगाडी वाले, फेरीवाले आजही सर्रास प्लास्टिक बॅगा देत होते. अनेकांनी प्लास्टिकला पर्याय शोधलेला नाही.

पालीकेच पथक जाणार प्रदर्शण पाहायला.

मुंबई महापालिकेने वरळी येथील एनएससीआय येथे प्लास्टिकला पर्यायी असणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन भरवले आहे. हे प्रदर्शण पाहण्याकरता रविवार ता.24 ला पालीकेचे अधीकारी मुंबईला जाणार असल्याची माहीती साहांय्यक आयुक्त तेजस्विनी गलांडे यांनी दिली आहे.

पनवेल महापालिका हेल्पलाईन

पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी प्लास्टिक संकलना संदर्भात १८००२२७७०१ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ९७६९ ०१२ ०१२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: After the parents complaint, municipal corporation action against used to handle the canteen.