
Shelar meets Shinde: रात्रीस खेळ चाले! शिंदे-पवार भेटीनंतर शेलार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची काही वेळापूर्वी वर्षा निवासस्थानी भेट झाली, त्यामुळं राजकीय कुजबुज सुरु झाली होती. त्यानंतर काही वेळात पवार आणि अदानी यांची भेट झाली, त्यामुळं या चर्चेला उधाण आलं होतं.
यानंतर तासाभरातच भाजप नेते आशिष शेलार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत. त्यामुळं आता आजच्या रात्री काहीतरी महत्वाच्या राजकीय घडामोडी घडणार असल्याची चिन्हे आहेत. (After Shinde Pawar and Pawar Adani meeting Ashish Shelar also riched to meets CM Shinde at Varsha Bunglow)
आजच रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शेलार हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांच्यामध्ये काय चर्चा होतेय किंवा या भेटीचं प्रयोजन काय हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण ही भेट ज्या दोन महत्वाच्या भेटींच्या पार्श्वभूमीवर होत आहे, त्यावरुन नक्कीच काहीतरी मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याची चिन्ह आहेत. (Latest Marathi News)
दरम्यान, रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. भेटीनंतर बाहेर पडताना त्यांनी माध्यमांशी कुठलाही संवाद साधला नाही. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना मराठा मंदिर या संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी आले असल्याचं सांगितलं होतं. (Marathi Tajya Batmya)
पण या भेटीनंतर उद्योगपती गौतम अदानी हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यांच्यात काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण यानंतर आता शेलार मुख्यंमत्र्यांच्या भेटीला पोहोचले आणि यावेळी माध्यमांशी बोलताना दोन राजकीय व्यक्ती भेट असतील तर काहीतरी राजकीय कारणच असेल असं सूचकपणे त्यांनी सांगितलं. त्यामुळं हा रात्रीचा खेळ नक्की काय आहे? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.