सायन रुग्णालयातल्या व्हिडिओनंतर KEM रुग्णालयातला व्हिडिओ व्हायरल..

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

काही दिवसांपूर्वी सायन रुग्णालयात मृतदेहाशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा एका व्हिडीओसमोर आला होता. त्यानंतर आता केईएम रुग्णालयातला एक व्हिडिओ समोर आला आहे.

मुंबई - काही दिवसांपूर्वी सायन रुग्णालयात मृतदेहाशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा एका व्हिडीओसमोर आला होता. त्यानंतर आता केईएम रुग्णालयातला एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत केईएम रुग्णालयात रुग्णांना खाली बसण्याची वेळ आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपचे नेते राम कदम यांनी केईएम रुग्णालयातला हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

हा व्हिडिओ आज सकाळी 11.45 चा असून राम कदम यांनी त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. अनेक रुग्ण जमिनीवर बसले आहेत. त्यांच्या वैद्यकीय सेवेचं काय? काहीच नाही का? अत्यंत दुःखद बाब.. महाराष्ट्र सरकारला कधी जाग येणार? असे प्रश्न त्यांनी या ट्विटमध्ये उपस्थित केला आहे. 

सावध व्हा ! कोरोनानंतर मुलांना होतोय 'कावासाकी' आजार, जाणून घ्या काय आहे प्रकरण
 

या ट्विटमध्ये राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना टॅग केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी रुग्णांची जी अवस्था निर्माण झाली आहे त्यावरुन सरकारवर घणाघाती टीका केली आहे. 

सायन रुग्णालयात मृतदेहाशेजारी कोरोना रुग्णांवर उपचार

सायन रुग्णालयात मृतदेहाशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. ज्या वॉर्डमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्याच वॉर्डमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह ठेवले आहेत. हा व्हिडीओ माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचे सुपूत्र भाजप आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. सायन रुग्णालयात रुग्णांच्या शेजारी मृतदेह सुद्धा ठेवले आहेत. काय प्रशासन आहे हे… अत्यंत लज्जास्पद, असं नितेश राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सायन रुग्णालयातील प्रकरणावर ट्वीट केलं होतं. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, सायन हॉस्पिटलमधली घटना अत्यंत गंभीर आहे. प्रेतांच्या बाजूला रुग्णांना उपचार घ्यावे लागते. ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुंबईकरांचा कोणीच वाली नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने तात्काळ लक्ष घालावे आणि अशी घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

'18 मे'पासून पुढे काय? कसा असेल नव्या ढंगातील लॉकडाऊन 4.0, वाचा महत्त्वाची बातमी...

मुंबईतच्या रुग्णालयात खाटांचा तुटवडा

रुग्णालयांतील खाटांच्या उपलब्धतेची समस्या सुटलेली नसून रुग्णालयांसह मैदाने, क्लब सेंटर्स याठिकाणी अतिरिक्त खाटांची उपलब्धता करण्यात आली आहे. तरीही अद्याप ती पुरेशी नसल्याचं चित्र आयसोलेशनसाठी असलेल्या खाटा, आयसीयू खाटा आणि व्हेण्टिलेटर्सची संख्या पाहता स्पष्ट होते. 

दरम्यान आताच मुंबईतील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता मुंबईतील खासगी आणि सरकारी रुग्णालयातील 80 टक्के बेड हे कोरोना रुग्णांसाठी ठेवावेत अशी शिफारस टास्क फोर्सने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

after video of sion hopital now video from KEM hospital is viral ram kadam tweets video


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after video of sion hospital now video from KEM hospital is viral ram kadam tweets video