भाजप पदाधिकारी कुलकर्णीला पुन्हा न्यायालयीन कोठडी

भाजप पदाधिकारी कुलकर्णीला पुन्हा न्यायालयीन कोठडी

कल्याण : बेकायदा शस्त्रसाठ्याप्रकरणी अटकेत असलेला डोंबिवलीतील भाजपचा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याला पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर कुलकर्णीची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली आहे. त्यामुळे कुलकर्णीच्या जामीनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडून कोणताही युक्तिवाद केला गेला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

धनंजय कुलकर्णी यांच्या डोंबिवलीतील तपस्या हाऊस ऑफ फॅशन नावाच्या दुकानात प्राणघातक शस्त्रे सापडली होती. कल्याण न्यायालयाने या प्रकरणी  त्याला थेट न्यायालयीन कोठडी सुनावल्याने सर्वांच्या भुवया उंच झाल्या होत्या. माध्यमांच्या दबावामुळे पोलिसांनी कुलकर्णीच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ही मुदत संपल्यामुळे मंगळवारी पुन्हा त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांकडून कोणताही युक्तिवाद न करण्यात आल्याने कुलकर्णीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे एकप्रकारे कुलकर्णीच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

कुलकर्णीने आपल्या वकिलाच्या माध्यमातून जामीन अर्ज दाखल केला असून, यावर बुधवारी सुनावणी होणार आहे. तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत कुलकर्णी याने कोणतेही सहकार्य केले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे या सुनावणीवेळी काही भाजप  पदाधिकारीही कोर्टात हजर होते. 

मागील सुनावणीत कुलकर्णी याला कोर्टात हजर करून सुनावणी झाली, याचा थांगपत्ता पोलिसांनी माध्यमांना लागू दिला नाही. यामुळे मंगळवारी सकाळपासून माध्यमांनी कोर्ट परिसरात हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांना चकवा देऊन पोलिस कुलकर्णीला घेऊन सुनावणीसाठी हजर झाले. सुनावणी झाल्यानंतरही कुलकर्णीला मीडियापासून वाचवण्यासाठी पोलिस त्याला घेऊन पळून गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com