एमआयडीसीच्या भूखंडावर पुन्हा अतिक्रमण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

एमआयडीसीची कारवाई थंडावल्याने संरक्षित करण्यात आलेल्या भूखंडावर पुन्हा अतिक्रमण करण्यात आले आहे. 

नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिघा येथील ९९ अनधिकृत इमारतींवर कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार एमआयडीसीने केरू प्लाझा, शिवराम, पार्वती व पांडुरंग या चार निवासी इमारती जमीनदोस्त केल्या. इमारती जमीनदोस्त करण्यात आल्यांनतर या भूखंडावर पुन्हा अतिक्रमण होऊ नये. यासाठी एमआयडीसीने पत्रे लावून भूखंड संरक्षित केला होता; मात्र आता एमआयडीसीची कारवाई थंडावल्याने संरक्षित करण्यात आलेल्या भूखंडावर पुन्हा अतिक्रमण करण्यात आले आहे. 

या भूखंडावर लावण्यात आलेले पत्रे काढून मटण विक्रेत्यांनी या ठिकाणी अतिक्रमण केले असून, पदपथांवरदेखील ताबा मिळवला आहे. मात्र पालिका व एमआयडीसी प्रशासन अतिक्रमण करणाऱ्या या मटणविक्रेत्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. यासंदर्भात दिघा विभाग अधिकारी प्रियंका काळसेकर व अतिक्रमण उपायुक्त अमरीश पटनिगिरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

एमआयडीसीच्या जागेवर मटणविक्रेत्यांनी अतिक्रमण केले असल्यास, एमआयडीसी प्रशासनाकडून संबंधितांवर कडक कारवाई येईल. 
- यशवंत मेश्राम, उपअभियंता, एमआयडीसी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Again on the MIDC plot Encroachment