पुन्हा आमचीच सत्ता येईल

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 एप्रिल 2018

मुंबई - केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार दमदार कामगिरी करीत असून, एकट्या महाराष्ट्रात चार वर्षांत दोन लाख कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. आता २०१९ लापण केंद्रामध्ये भाजपच सत्तेत येणार आहे; तसेच राज्यातही भाजपची सत्ता येईल, असा विश्‍वास केंद्रीय रस्तेवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज महामेळाव्यामध्ये बोलताना व्यक्त केला. 

भाजपच्या महामेळाव्यामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील आदींनी भाषणे केली महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेची बाजू घेत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. शिवसेनेला गांडूळ म्हणणारेच राज्याला लागलेली वाळवी आहेत. हल्लोबोल यात्रा काढणाऱ्यांनी आधी स्वतःचा गल्ला भरला असून, भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत, असा टोला पाटील यांनी लगावला.

गोपीनाथ मुंडेंचा विसर
ज्यांनी महाराष्ट्रात भाजप वाढवली त्या भाजपचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो महामेळाव्याच्या ठिकाणी न लावल्यामुळे मुंडेसमर्थक नाराज झाल होते, याचा निषेध करण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. महामेळावा सुरू होण्यापूर्वी हा प्रकार घडला. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी घोषणाबाजी करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु नाराज कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली.

Web Title: Again we will get our power