चमचमीत मटण.. म्हावरा आणि बरंच काही! 

मयुरी काकडे-चव्हाण
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

कल्याण : आगरी कोळी पद्धतीचे चमचमीत मटण, चिकन, मासे, तांदळाची भाकरी व इतर लज्जतदार व मसालेदार पदार्थांचा आस्वाद लुटण्याची संधी खवय्यांना मिळणार आहे. कल्याणमध्ये आजपासून (ता. 30) आगरी -कोळी महोत्सवाची सुरवात होत असून नागरिकांना खाद्यपदार्थ्यांच्या मेजवानीसह सांस्कृतिक मेजवानीचाही लाभ घेता येणार आहे. 

आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडळातर्फे 30 नोव्हेंबर ते  2 डिसेंबरपर्यंत या कालावधीत कल्याण पश्चिमेकडील  फडके मैदान येथे भव्य दिव्य आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या उपक्रमात सांस्कृतिक- पारंपरिक नृत्य, नाट्य व  सामाजिक उपक्रमांची रेलचेल असणार आहे. आगरी समाजातील खाद्यपदार्थांबाबत  सर्वांनाच आकर्षण असते. त्यामुळे  चुलीवर बनवलेल्या  अस्सल आगरी  पदार्थांचा  खवय्यांना यथेच्छ आस्वाद येथे घेता येणार आहे. आगरी कोळी उत्कर्ष समाज मंडळाचे पदाधिकारी विश्वनाथ भोईर, साईनाथ तारे, प्रकाश भोईर, उल्हास भोईर, अर्जुन भोईर, सुनिल वायले यांच्यासह इतर  सदस्य या  महोत्सवासाठी मेहनत घेत आहेत. 

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी, महाराष्ट्र कोळी महासंघ अध्यक्ष अनंत तरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार कपिल पाटील यांच्या  उपस्थितीत  समारोप सोहळा संपन्न होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यादेखील 1 डिसेंबरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे साईनाथ तारे यांनी सकाळशी बोलताना सांगितले. त्यामुळे या व्यासपीठावरून अनेक जाहीर  राजकीय विधानं होणार आहे.

Web Title: agari koli festival starts from today in kalyan