'या' वयोगटातील नागरिकांमध्ये दिसतोय कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona-updates

पाहा वयोगटानुसार किती आहे प्रमाण...

'या' वयोगटातील नागरिकांमध्ये दिसतोय कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग

मुंबई: कोरोना (Coronavirus) २०२०च्या सुरूवातीला देशात (India) आणि राज्यात (Maharashtra) दाखल झाला. २०२१मध्ये कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आली. आता काही महिन्यांतच कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) येण्याची भीती वर्तवली जात आहे. या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना (Kids) बसण्याची शक्यता आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग (Most Infected Age Group) कोणत्या वयोगटात दिसून येतोय, याबद्दलची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्येत सध्या घट होत असून दुसऱ्या लाटेच्या शेवटच्या टप्प्यातदेखील तरुण म्हणजेच 31 ते 40 या वयोगटातील नागरिक सर्वाधिक कोरोना बाधित असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. या वयोगटातील बाधित होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी 22.34 इतकी असून ही चिंतेची बाब असल्याचे बोललं जात आहे. (Age Group 31 to 40 is most infected with deadly Coronavirus in second wave)

सर्व वयोगटातील एकूण बाधितांची संख्या 54 लाख 42 हजार 683 एवढी आहे. राज्यात कडक निर्बंध सुरु आहेत. रुग्ण संख्या कमी होत असल्याने हे निर्बंध शिथिल करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे. मात्र, सध्याच्या बाधितांची संख्या आणि टक्केवारी पाहिल्यास निर्बंध शिथिल केल्यास संसर्ग पुन्हा फोफावू शकतो, असे मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

हेही वाचा: "शिवसेनेला कोकणी माणसाने खूप काही दिलं, पण..."

वयोगटानुसार कोरोना संसर्गाची आकडेवारी

 • 0 ते 10 वयोगटातील बालकांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण 3.07 टक्के असून एकूण 1 लाख 67 हजार 357 मुलं बाधित आहेत.

 • 11 ते 20 वर्षे वयोगटातील 3 लाख 83 हजार 885 एवढे बाधित असून 7.05 टक्के एवढे प्रमाण आहे.

 • 21 ते 30 वर्षे वर्षातील 9 लाख 74 हजार 986 नागरिक कोरोना बाधित झाले असून यांची टक्केवारी 17.91 एवढी आहे.

 • 31 ते 40 वर्षे वयोगटात 12 लाख 15 हजार 849 एवढे संसर्गित झाले आहेत. हे प्रमाण 22.34 टक्के एवढे आहे.

 • 41 ते 50 वर्षे वयोगटातील एकूण 9 लाख 83 हजार 176 रूग्ण बाधित असून हे प्रमाण 18.06 टक्के आहे.

 • 51 ते 60 वर्षे वयोगटातील 8 लाख 4 हजार 406 बाधित असून 14.78 टक्के एवढे हे प्रमाण आहे.

 • 61 ते 70 वर्षातील 5 लाख 56 हजार 291 एवढे बाधित असून प्रमाण 10.22 टक्के आहे.

 • 71 ते 80 वर्षे वयोगटातील 2 लाख 68 हजार 536 बाधित त्यांचे प्रमाणे 4.93 टक्के आहे.

 • 81 ते 90 वर्षे वयोगटातील 76 हजार 275 बाधित असून त्यांची टक्केवारी 1.40 टक्के एवढी आहे.

 • 91 ते 100 वर्षे वयोगटातील 10 हजार 757 रूग्ण बाधित असून त्यांचे प्रमाण 0.20 टक्के आहे.

 • 101 ते 110 वर्षे वयोगटातील 1 हजार 165 लोक बाधित होऊन त्यांची टक्केवारी 0.02 एवढी आहे.

हेही वाचा: गोव्यातील विदेशी दारूचा साठा महाराष्ट्रात केला जप्त

लहान मुलांसाठी सुविधा वाढवणे गरजेचे!

दुसऱ्या लाटेमध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर पॉझिटीव्ह आले आहेत पढ, मृत्यूची टक्केवारी वाढलेली नाही. मृत्यू नक्कीच वाढले आहेत पण प्रमाण मात्र कमी आहे. 31-40 वयोगटातल्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे तिसऱ्या लाटे मध्ये लहान मुलांना संसर्गाचा जास्त धोका आहे त्यामुळे लहान मुलांसाठी पेडिऍट्रिक सुविधा वाढवण्याची गरज आहे. तरुण मंडळी आता कामावर जायला बाहेर पडत आहे. त्यामुळे, 30 ते 40 वयोगटातील नागरिकांना संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे. दुसर्‍या लाटेतही अशीच परिस्थिती आहे. शिवाय, मृत्यूही याच वयोगटातील जास्त होत आहेत. त्यामुळे, रोगप्रतिकारशक्ती जरी चांगली असेल तरीही सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे.

-डॉ. अविनाश सुपे, सदस्य, कोविड टास्क फोर्स

loading image
go to top