मृत नागरिकांना श्रद्धांजली वाहून नागरिकांनी केले प्रशासनाविरोधात आंदोलन

 सुचिता करमरकर
सोमवार, 9 जुलै 2018

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे बळी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहून प्रशासनाचा निषेध करत नागरिकांनी शिवाजी चौकात आंदोलन केले. सेवा नाही तर कर नाही संघटनेमार्फत हे आंदोलन केले. यानंतर आंदोलनकर्त्यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली. रस्त्यांच्या प्रश्नावर संबंधित यंत्रणांची बैठक बारा जुलैला घेण्यात येईल अशी माहिती आंदोलनकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी दिली.

शनिवारी (ता.7) शिवाजी चौकात झालेल्या अपघातात मनिषा भोईर या महिलेचा मृत्यू झाला होता. दोन जुनलाही याच ठिकाणी झालेल्या अपघातात पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. पालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात घडले आहेत. कल्याणसह डोंबिवली तसेच सत्तवास गावातील रस्त्यांच्या स्थितीबाबत एकच चित्र पहायला मिळते. यात बदल व्हावा या प्रमुख मागणीसाठी नागरिकांनी आज आंदोलन केले. भर पावसातही नागरिकांनी यात सहभागी होत प्रशासनावरील नाराजी व्यक्त केली.  पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी याबाबत चर्चाही करण्यात आली. पालिका तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकाऱ्यांसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक घेण्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले. बारा जुलैला ही बैठक होणार आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीही याच विषयात पालिका मुख्यालयात आंदोलन केले.          

Web Title: agitation against administration with tribute ti die citizens