मुंबई - महाराष्ट्र माथाडी संघटनेच्या वतिने भव्य बनियन मुकमोर्चा

दिनेश चिलप मराठे
बुधवार, 12 डिसेंबर 2018

मुंबादेवी -  स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा बाबु गेनू यांच्या स्मृतीदिनी आज माथाडी, वारणार, मापाडी, सुरक्षा रक्षक कामगार, पालावाला महिला व अन्य घटकांनी माथाडी भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीच्यावतीने भव्य बनियन मुकमोर्चा काढला.

मुंबादेवी -  स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा बाबु गेनू यांच्या स्मृतीदिनी आज माथाडी, वारणार, मापाडी, सुरक्षा रक्षक कामगार, पालावाला महिला व अन्य घटकांनी माथाडी भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीच्यावतीने भव्य बनियन मुकमोर्चा काढला.

माथाडी कामगारांच्या अनेक समस्या आहेत. माथाडी कायदा व कामगार चळवळीची मोडतोड, तसेच कामगार विरोधी कृती करणा-या राज्याचे कामगार मंत्री, कामगार विभागाचे प्रधान सचिव व पणन विभागाचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, लातूर, अहमदनगर आणि इतर जिल्ह्यातही माथाडींच्या मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 

महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते व अण्णासाहेब पाटील, आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली नहा मोर्चा काढण्यात आला. 

मुकमोर्चात माथाडी कामगार नेते कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, अखिल भारतीय माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे चंद्रकांत शेवाळे, महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे नेते बळवंतराव पवार, पोपटराव पाटील, सतीशराव जाधव, सुरक्षा रक्षक संघटनेचे प्रतिनिधी आदी नेते सहभागी होते. 

कामगार नेते डॉ.बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यात या सर्व नेत्यांचा समावेश आहे. ही समिती माथाडी कामगारांच्या मागण्यांसाठी गेल्या दोन वर्षापासून सातत्याने कार्य करत आहे. मात्र सरकार याची दखल घेत नाही.

माथाडी भवन येथून निघालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्यानंतर माथाडींचे आराध्यदैवत स्व.आमदार अण्णासाहेब पाटील व स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा बाबु गेनू यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. संतप्त कामगार नेते व कार्यकर्त्यांनी त्यांनी आपले बनियन व शर्ट काढून रणरणत्या उन्हात दोन तास ठिय्या आंदोलन केले. माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या संबंधीत असलेल्या प्रश्नांचे निवेदन यावेळी महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीच्यावतिने सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील यांचेकडे सुपुर्द करण्यात आले. 

यानंतर माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मुकमोर्चाला संबोधीत केले. माथाडी कामगारांच्या रास्त मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही अशीच तीव्र आंदोलने करु. वेळ पडल्यास कामगार मंत्री व कामगार विभागाच्या प्रधान सचिवाच्या कार्यालयात अशीच शर्ट व बनियन काढून आंदोलने करु. यानंतर त्यांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे जाहिर केले. 

या मुकमोर्चात एकनाथ जाधव, वसंतराव पवार, आनंद पाटील, चंद्रकांत पाटील, गुंगा पाटील, रविकांत पाटील, अरुण रांजणे, प्रकाश पाटील, हणमंतराव सुरवसे, अशोक पाटील, चंद्रकांत बोबेडे, लक्ष्मणराव भोसले, शिवाजी सुर्वे आदी पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: agitation by maharashtra mathadi sanghatana in mumbai