कल्याण आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा निघणार

रविंद्र खरात 
रविवार, 8 जुलै 2018

कल्याण आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभाग नगरसेवक आणि अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी दिली. 

कल्याण - रिक्षा आणि टॅक्सी चालक मालकांच्या समस्याबाबत शासनाकडे विविध मागण्याकरून अंमलबजावणी करण्यास उशीर होत असून शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी गुरुवार ता. 12 जुलै ला कल्याण आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभाग नगरसेवक आणि अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी दिली. 

रिक्षा आणि टॅक्सी चालक मालकांच्या विविध समस्या शासनाकडे पाठपुरावा सुरू असून त्याबाबत अंमलबजावणीसाठी उशिर होत असल्याने कल्याण मधील मोरया हॉल मध्ये शनिवार ता. 7 जुलै ला रिक्षा टॅक्सी महासंघाच्या कोकण विभागातील प्रतिनिधींची महत्वपूर्ण बैठक झाली.

या बैठकीला अध्यक्ष प्रकाश पेणकर, विनायक सुर्वे, राजु राउत, हेमंत पवार, नारायण राज पुरोहित, एकनाथ पिगंळे सुनील बोर्डे, कासम मुलानी, किरण म्हात्रे, सतिश आचार्य, बाळा भोईर, अविनाश खिलारे अशोक शेटे, साई चंदने, शिवाजी पाटील, रामदास पाटील, अकुंश म्हात्रे, शेखर जोशी, उदय शेट्टी आदीं उपस्थित होते. यावेळी विविध समस्या मांडण्यात आल्या.

शासनाला निवेदन देऊन ही शासनाने विविध मुद्द्यावर अंमलबजावणी न केल्याने शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी गुरुवार ता. 12 ला सकाळी 11 वाजता कल्याण आरटीओ कार्यालयवर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

रिक्षा चालकांच्या प्रमुख मागण्या  :

1) परिवहन शुल्काच्या नावाने शासनाचा महसूल वाढविणे हा एकमेव उद्देश ठेवुन कोणत्याही प्रकारे निकष न ठरविता रिक्षा टॅक्सी चीं संख्या प्रचंड वाढ करून रिक्षा टॅक्सी व्यवसायावर परिणाम झाला असून विविध शहरात वाहतूक कोंडी होत आहे त्यामुळे व्यवसाय होत नसून नविन रिक्षा टॅक्सी परवाने वाटप बंद करा आणि नविन परवाने खुल्ले ओपन वाटप पध्दत स्थगित करा.

2) विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळ स्थापना व निधीची तरतूद माथाडी कामगार च्या धर्तीवर ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळ अंमलबजावणी विनाविलंब करा.

3) महागाई निर्देशांकानुसार दरवर्षी योग्य ती आॅटोरिक्षा भाडे दर वाढ विनाविलंब तातडीने देण्याबाबत आग्रही रास्त मागणी.

4) आॅटोरिक्षा योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण (पासिंग) होणारा विलंब समस्या अडीअडचणी उपाययोजना व पासिंग योग्य वेळी व जलद गतीने करण्यासाठी त्या त्या आरटीओ कार्यालयात स्वतंत्र 100 मीटर पासिंग ट्रॅक् नवनिर्मिती करा.

5) ओला ऊबेर खाजगी कंपनी व अवैध्य चोरटी प्रवासी वाहतूक वाहने प्रतिबंध व कायदेशीर नियंत्रण करा. 

6 ) म्हाडा तर्फे ऑटोरिक्षा टॅक्सी चालकांना अल्प किंमतीच्या दरात निवास (घरे) उपलब्ध करून द्या.

7) सिएनजी गॅस बाटला टेस्टिंग खाजगी कंपनी यांचे कडुन पुर्वी 600 ते 700 आता 2500 ते 3000 इतके वाढीव सिएनजी गॅस बाटला टेस्टिंग शुल्क कमी करा. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: A agitation rally will be organized at Kalyan RTO office