उल्हासनगरमध्ये वाढीव वीज बिलाच्या विरोधात साईपक्ष रस्त्यावर

ullasnagar.
ullasnagar.

उल्हासनगर - पूर्वी कमी येणारे वीज बिल अधिक प्रमाणात किंबहूना अनेक पटीने येत असल्याने ते भरताना सर्वसामान्यांसोबत व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वारंवार विनंत्या करूनही अधिकारी वीज बिल कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेत नसल्याने आज उल्हासनगरातील साई पक्षाने वाढीव वीज बिलाच्या विरोधात रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली.

विद्युत मंडळाने जुने वीज मीटर काढून त्याबदल्यात नवीन मीटर बसवले आहे. त्याची गती एव्हडी आहे की पूर्वी जुने मीटर असताना जेमतेम येणारे वीज बिल नव्या मीटर मध्ये पाच ते सहा पटीने येऊ लागले आहे. याबाबत साईपक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उल्हासनगर महानगरपालिकाचे उपमहापौर जीवन इदनानी,राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील गंगवानी यांनी विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. मात्र त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येत नसल्याने साईपक्षाने आज धरणे-आंदोलनाचे आयोजन करून वाढीव-अतिरिक्त वीज बिलाच्या महाकंप्लेटस करण्याची हाक नागरिकांना दिली होती.

साईपक्षाने साईबाबा मंदिरा जवळ असलेल्या विद्युत मंडळाच्या कार्यालयासमोर काळ्याफीती लावून धरणे आंदोलन करताना काही मिनिटांसाठी रास्तारोको देखील केला.आणि शेकडो नागरिकांनी वाढीव वीज बिलाच्या केलेल्या महाकंप्लेट्स कार्यकारी अभियंता रामराव राठोड यांच्याकडे दिल्या. वाढीव वीज बिलाच्या आलेल्या महाकंप्लेट्स विषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात येणार असे आश्वासन राठोड यांनी साईपक्षाचे राष्ट्रीयअध्यक्ष जीवन इदनानी, उपाध्यक्ष सुनील गंगवानी यांना दिले. 

या आंदोलनात माजी महापौर आशा इदनानी,लाल पंजाबी, नगरसेवक टोनी सिरवानी, गजानन शेळके, नगरसेविका इंदिरा उदासी, ज्योती बठीजा, पिंटो बठीजा, राजेश मल्होत्रा, दीपक लालवानी, किशन कुकरेजा, नवीन दुधानी, भावना छाबरीया, वर्षा लिलवानी, जयश्री थावानी, जितू गुरसहानी, शंकर मालवणकर, आदी सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागरिक सहभागी झाले होते. मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठपोलीसनिरीक्षक विजय डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीसनिरीक्षक अनिल भिसे यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केलाहोता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com