कृषी कायदे, इंधन दरवाढीविरोधात, 16 जानेवारीला राजभवनाला घेराव; बाळासाहेब थोरात यांचा इशारा

कृषी कायदे, इंधन दरवाढीविरोधात, 16 जानेवारीला राजभवनाला घेराव; बाळासाहेब थोरात यांचा इशारा


मुंबई : कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकरी संघर्ष करत आहेत. हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर गेल्या 40 दिवसांपासून लाखो शेतकरी ठाण मांडून बसलेत. या आंदोलनात आतापर्यंत 60 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना जीव गेला आहे; मात्र केंद्रातील असंवेदनशील सरकारला अद्याप जाग आलेली नाही. या निर्दयी मोदी सरकारला जागे करण्यासाठी, शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी तसेच इंधन दरवाढीविरोधात 16 तारखेला राजभवनाला घेराव घालण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. 

थोरात म्हणाले, की केंद्रातील मोदी सरकार शेतकरी, कामगार, सामान्य जनतेच्या मुद्द्यांवर कमालीचे असंवेदशील आहे. जुलमी कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून ते भांडवलदारांच्या हिताचे आहेत. शेतकऱ्यांची भूमिका योग्य असून कॉंग्रेसने विविध आंदोलनांच्या माध्यमातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. केंद्राचे हे काळे कृषी कायदे महाराष्ट्रात लागू केले जाणार नाहीत, ही कॉंग्रेस पक्षाची भूमिका आहे. दुसरीकडे इंधन दरवाढ करून सामान्य जनतेची लूट सुरू आहे. त्याविरोधात 16 तारखेला आंदोलन केले जाणार आहे. 

16 जानेवारीला "किसान अधिकार दिवस' पाळत आंदोलन केले जाणार आहे. कॉंग्रेस पक्षाने या जुलमी सरकारविरोधात याआधीही रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे. यापुढेही सरकारला जागे करण्यासाठी संघर्ष करत राहणार. 
- बाळासाहेब थोरात,
प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस. 

-------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Agriculture Act, against fuel price hike, siege of Raj Bhavan on 16th January Warning of Balasaheb Thorat

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com