मुंबईत बुधवारी कृषी पर्यटन महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

मुंबई - ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी बुधवारी (ता. 16) कृषी पर्यटन महोत्सव होणार आहे. कृषी पर्यटन उद्योगावर विचारमंथन करून शहरी-ग्रामीण भागाची नाळ जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

मुंबई - ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी बुधवारी (ता. 16) कृषी पर्यटन महोत्सव होणार आहे. कृषी पर्यटन उद्योगावर विचारमंथन करून शहरी-ग्रामीण भागाची नाळ जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

शेतीला जोडधंद्याची जोड दिली तरच भविष्यात पारंपरिक शेती टिकून राहील. कृषी पर्यटन यासाठी योग्य पर्याय आहे. त्या दृष्टीने कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी माहिती आणि राज्य सरकारचे कृषी पर्यटन धोरण याची माहिती महोत्सवाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रीय कृषी पर्यटन परिषद होणार आहे. राज्यात 510 कृषी पर्यटन केंद्रे सुरू आहेत. गेल्या वर्षी सात लाख पर्यटकांनी कृषी पर्यटनाला भेटी दिल्या. त्यातून 21 कोटींचे उत्पन्न कृषी पर्यटन केंद्रचालकांना मिळाले आहे. प्रत्येक केंद्रावर 5 ते 10 स्थानिक युवकांना तसेच बचत गटांच्या महिलांना रोजगार मिळाला आहे.

Web Title: agriculture tourism festival