अहमदाबाद-मुंबई विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

मुंबई - एअर इंडियाच्या अहमदाबादहून मुंबईला येणाऱ्या "एआय-985' या विमानात बुधवारी (ता. 20) अचानक तांत्रिक बिघाड उद्‌भविल्यामुळे रात्री 8.36 वाजता ते मुंबई विमानतळावर आपत्कालीन स्थितीत उतरविण्यात आले. या विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

बिघाडाची माहिती मिळताच मुंबई विमानतळावर आणीबाणी घोषित करून विमान उतरण्याची आवश्‍यक ती तयारी करण्यात आली. हे विमान मुंबईहून मस्कतला रवाना होणार होते. यात कर्मचाऱ्यांसह 176 प्रवासी होते. या विमानातील मस्कतला जाणाऱ्या प्रवाशांची दुसऱ्या विमानाने सोय करण्यात आल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्‍त्यांनी दिली.

Web Title: ahmadabad mumbai plane emergency landing