अहमद खान यांची '2 मॅड'मध्ये एन्ट्री

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

मुंबई - महाराष्ट्राचा अस्सल डान्सरमध्ये प्रेक्षकांना दर आठवड्याला काहीना काही सरप्राईज मिळते. या आठवड्यातही "2 मॅड'च्या मंचावर आले आहेत "रंगीला', "ताल', "गजनी', "किक' आदी अनेक चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक अहमद खान. दिलखुलास व्यक्तिमत्व, परफेक्‍शनिस्ट, उत्तम डान्सर असलेले अहमद खान यांची "2 मॅड'च्या मंचावर धमाकेदार एन्ट्री तर झालीच; पण ते स्पर्धकांसाठी एक सरप्राईजही घेऊन आले आहेत. त्यांचे सरप्राईज 27 आणि 28 फेब्रुवारीला जगजाहीर होईल.

अहमद खान यांनी या मंचावर स्पर्धकांबरोबर बरीच धम्मालही केली. अहमद खान यांच्यासमोर स्पर्धकांनी उत्तमोत्तम नृत्ये सादर केली. नृत्याबद्दल विशेष प्रेम असलेले आपले परीक्षक उमेश जाधव आणि अहमद खान यांनी "कोंबडी पळाली' आणि "बाय गो बाय गो'वर धमाल
नृत्य सादर केले. त्यांनी प्रेक्षकांनाही थिरकायला लावले.

Web Title: ahmed khna entry in 2 mad