हवाई दलाचे विमान घसरले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मे 2019

मुंबई : हवाई दलाचे एएन-३२ मालवाहू विमान मंगळवारी (ता. ७) रात्री मुंबई विमानतळावरून उड्डाण करताना घसरले. हे विमान कर्नाटकमधील बेंगळूर येथील येळाहंका तळाकडे निघाले होते.

मुंबई : हवाई दलाचे एएन-३२ मालवाहू विमान मंगळवारी (ता. ७) रात्री मुंबई विमानतळावरून उड्डाण करताना घसरले. हे विमान कर्नाटकमधील बेंगळूर येथील येळाहंका तळाकडे निघाले होते.

या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी बुधवारी (ता. ८) पहाटेपासून सुमारे ५० उड्डाणे रद्द करण्यात आली. हवाई दलाचे एएन-३२ हे मालवाहू विमान मुंबई विमानतळावरून मंगळवारी रात्री ११.३२ वाजता उड्डाण करताना तांत्रिक बिघाडामुळे घसरले. वैमानिकाने प्रसंगावधान राखून विमान थांबवल्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. हे विमान कर्नाटकमधील बेंगळूर येथील हवाई दलाच्या येळाहांका तळावर जात होते. बुधवारी सकाळपर्यंत हे विमान धावपट्टीवरून हटवण्यात आले नव्हते. त्यामुळे पहाटेपासून सुमारे ५० उड्डाणे रद्द करावी लागली. बुधवारी दुपारी ४.५० वाजता हे विमान धावपट्टीवरून हटवल्यानंतर उड्डाणे सुरू झाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Air Force aircraft collapsed