विमानाचा दरवाजा बंद करताना हवाईसुंदरी जमिनीवर आदळली!

A Air Hostess Falls Off Delhi Bound Plane While Closing Door
A Air Hostess Falls Off Delhi Bound Plane While Closing Door

मुंबई - दिल्ली विमानाचा दरवाजा बंद करताना एअर इंडिया विमानाची हवाईसुंदरी थेट जमिनीवर आदळली. या अपघातात तिला गंभीर दुखापत झाल्याने तातडीने जुहू येथील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

हर्षा लोबो (वय 53) असे या हवाईसुंदरीचे नाव आहे. एअर इंडियाचे विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल विमानतळावरुन टेक ऑफकरण्याच्या तयारीत होते. तेव्हा विमानाचे दार बंद करताना हर्षा यांचा तोल गेला आणि त्या थेट जमिनीवर आदळल्या. सकाळी 7 च्या सुमारास जखमी अवस्थेत तिला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात त्यांच्या पायाला, पोटाला आणि पाठीच्या कण्याला दुखापत झाली आहे. त्यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर असल्याचेही नानावटी रुग्णालयाचे मुख्य अधिकारी डॉ. राजेंद्र पाटणकर यांनी सांगितले. डॉक्टर्स तिच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून असल्याचेही ते म्हणाले. तर संबंधित एअर लाइनने या घटनेबाबत खेद व्यक्त करत या घटनेच्या चौकशीचे आश्वासन दिले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com