वांद्य्रात दाऊद असल्याची अफवा दूरध्वनी आल्यानंतर यंत्रणा दक्ष 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

मुंबई - एअर इंडियाच्या कॉल सेंटरला दूरध्वनी करून वांद्य्रातील एका बसमध्ये कुख्यात गुंड "मोस्ट वॉंटेड' दाऊद इब्राहिमला त्याच्या साथीदारासह पाहिल्याचा दावा करण्यात आला. वांद्रे शॉपिंग सेंटर उडवून देण्याबाबत त्यांच्यात संवाद सुरू असल्याची माहिती एकाने दिली. या कॉलच्या चौकशीनंतर ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले आणि मिळालेल्या माहितीत काहीही तथ्य नसल्याचे उघड झाले. 

"हॅलो, एअर इंडिया कॉल सेंटर? मी दाऊद इब्राहिम आणि त्याच्या तीन साथीदारांना वांद्रे कार्टर रोडमध्ये पाहिले आहे. वांद्रे शॉपिंग सेंटरमध्ये बॉंब ठेवला आहे, असे ते बोलत होते,' अशी माहिती देणारा दूरध्वनी आल्यानंतर शहरातील सर्व सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या. एअर इंडियाच्या कॉल सेंटरला बुधवारी (ता. 18) असाच एक दूरध्वनी आला. त्यात विराज शर्मा असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने दुपारी 2 च्या सुमारास वांद्रे येथे एका बसमध्ये दाऊद इब्राहिम व तीन साथीदार बसले होते. ते वांद्रे शॉपिंग मॉल उडविण्याबाबत चर्चा करत होते, असे सांगितले. याबाबत सीआयएसएफ व इतर सुरक्षारक्षकांना कळविण्यात आल्यानंतर सर्वच सज्ज झाले. दूरध्वनी करणाऱ्याने दाऊद इब्राहिम याचे नाव घेतले. तसेच तो प्रवास करत असलेल्या बसचा क्रमांक एचआर 35 क्‍यू 3549 असा सांगितला. त्याचवेळी ही अफवा असल्याचा संशय होता; तरीही दक्षता म्हणून सर्व यंत्रणांना माहिती देण्यात आली. संबंधित व्यक्तीचा दूरध्वनी करण्यामागचा हेतू पडताळणार असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Air India call center phone