हवेत इंजिन बंद पडल्याने AI च्या विमानाचे मुंबईत इमरजन्सी लॅन्डिंग

घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून चौकशी करण्यात येत आहे.
Air-India
Air-IndiaSakal

मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणानंतर मुंबई-बंगळुरू एअर इंडियाच्या (Air India) विमानाचे आपतकालीन लॅन्डिंग (Emergency Landing) करावे लागले. दरम्यान, काही तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे एक इंजिन हवेत बंद पडले. त्यानंतर या विमानाचे मुंबई विमानतळावर (Mumbai Airport ) इमरजन्सी लॅन्डिंग करण्यात आले. घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून चौकशी करण्यात येत आहे. (Air India Flight Emergency Landing In Mumbai )

याबाबत अधिक माहिती अशी की, एअर इंडियाचे मुंबई बंगळुरू AI-639 विमानाने मुंबई विमानतळावरून नियोजित वेळेनुसार उड्डाण केले. मात्र, उड्डाणानंतर साधरण 27 मिनिटानंतर वैमानिकाला इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा संदेश प्राप्त झाला. त्यानंतर वैमानिकाने सर्व शक्यता पडताळत मुंबई विमानतळावर सुरक्षित लॅन्डिंग केले.

सुरक्षेला प्राधान्य

या घटनेनंतर एअर इंडियाच्या प्रवक्त्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. "एअर इंडिया सुरक्षेला खूप महत्त्व देते आणि आमचे क्रू मेंबर अशा कठीण परिस्थिती हातळण्यास पारंगत असल्याचे म्हटले आहे. घटनेनंतर संबंधित विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानाने बंगळुरुला रवाना करण्यात आली आहे. ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याचा तपास एअर इंडियाच्या अभियंत्यांकडून तपास करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com