अंबरनाथ MIDC मध्ये वायुगळती; नागरिकांना उग्र वास व खोकल्याचा त्रास

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 5 September 2020

अंबरनाथमधील एएमपी गेट परिसरातील एमआयडीसीमधील रासायनिक कंपनीमधून शनिवारी गॅस सोडण्यात आल्याने कानसई परिसरातील नागरिकांना उग्र वासाचा आणि खोकल्याचा त्रास होत आहे. 

अंबरनाथ : अंबरनाथमधील एएमपी गेट परिसरातील एमआयडीसीमधील रासायनिक कंपनीमधून शनिवारी गॅस सोडण्यात आल्याने कानसई परिसरातील नागरिकांना उग्र वासाचा आणि खोकल्याचा त्रास होत आहे. रासायनिक कारखान्यातून निघणारा वाफसदृश्य वायू बाहेर पडल्यावर पावसाच्या ढगाळ वातावरणामुळे तो वर आकाशात जाण्याऐवजी हवेच्या दाबाने पुन्हा खाली येतो. परिणामी नागरिकांना खोकल्याचा त्रास जाणवू लागतो.

मुंबईत पुन्हा कहर वाढला; गेल्या 24 तासात 1,735 नव्या रुग्णांची भर; वाचा सविस्तर

शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वायू कानसई, साई आदी विभागात पसरू लागला. मनसेचे शहर अध्यक्ष कुणाल भोईर, काँग्रेसचे नरेंद्र काळे आदींनी नागरिकांशी संपर्क साधला आणि सतर्क राहण्याची सूचना केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून ते चौकशी सुरू करीत असल्याची माहिती  कुणाल भोईर यांनी दिली.

--------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Air leak in Ambernath MIDC; Citizens suffer from bad breath and cough