हवाई वाहतुकीत महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

मुंबई - हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात महिलांनी पुढे यावे यासाठी "इंडियन वूमेन्स पायलट्‌स असोसिएशन ऍण्ड इंटरनॅशनल वूमेन्स प्रोफेशनल्स इन एव्हिएशन ऍण्ड एरोस्पेस' प्रयत्न करणार आहे, अशी माहिती "प्रेस क्‍लब'मध्ये पत्रकार परिषदेत देण्यात आली.

मुंबई - हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात महिलांनी पुढे यावे यासाठी "इंडियन वूमेन्स पायलट्‌स असोसिएशन ऍण्ड इंटरनॅशनल वूमेन्स प्रोफेशनल्स इन एव्हिएशन ऍण्ड एरोस्पेस' प्रयत्न करणार आहे, अशी माहिती "प्रेस क्‍लब'मध्ये पत्रकार परिषदेत देण्यात आली.

साठच्या दशकात महिला वैमानिक पुढे येऊ लागल्या तेव्हाही हे क्षेत्र पुरुषप्रधान होते. आजही तशीच परिस्थिती आहे, असे एअर इंडियामध्ये प्रमुख विमान सुरक्षा अधिकारी म्हणून काम करणाऱ्या हरप्रीत सिंग यांनी सांगितले. महिला आणि पुरुषांना समान वागणूक मिळत नाही. त्यांचे प्रशिक्षण आणि पगारातही फरक असतो, असे पर्यवेक्षक संगीता काब्रा यांनी सांगितले.

या क्षेत्रात महिला आणि मुलींना प्राधान्य मिळावे. महिलांना चांगला पाठिंबा मिळावा. आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे त्यांना या क्षेत्रापासून दूर राहावे लागू नये यासाठी असोसिएशन प्रयत्न करणार आहे, अशी माहिती हरप्रीत सिंग यांनी दिली. यासाठी इंडियन वूमेन्स पायलट असोसिएशनमध्ये एव्हिएशन आणि एअरोस्पेसमधील महिलांना घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गरीब कुटुंबांतील महिलांना वैमानिकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी असोसिएशनतर्फे गुणवत्तेवर आर्थिक मदत करण्यात येते, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

या वेळी महिलांमध्ये पहिल्या वैमानिक ठरलेल्या सौदामिनी देशमुख, इंडियन पायलट असोसिएशनमधील पहिल्या महिला राबिया पटेल, मोहिनी श्रॉफ, डॉ. सुनीला भजेकर उपस्थित होत्या. त्यांनीही आपल्या आठवणी सांगितल्या.

Web Title: Air traffic trying to promote women