ऐरोली : गणेश नाईक यांचा 50 हजारांचा टप्पा पार Election Results 2019 esakal

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

ऐरोली विधानसभा मतदारसंघात 20 व्या फेरीअखेर भाजप-शिवसेना महायुतीचे गणेश नाईक 53 हजार मतांनी आघाडीवर आहे.

ऐरोली : नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघात 20 व्या फेरीअखेर भाजप-शिवसेना महायुतीचे गणेश नाईक यांनी 53 हजार मतांची आघाडी घेतली आहे. नाईक यांनी मतांची फिफ्टी पुर्ण केल्याने कार्यकर्ते जल्लोष करताना दिसून येत आहे.

20 व्या फेरीत दुपारी साडे बारा वाजेपर्यत भाजपच्या गणेश नाईक यांना 3238 मते मिळाली आहेत. मनसेच्या गणेश बाणखेले यांना 550 तर राष्ट्रवादीच्या गणेश शिंदे यांना 1863 मते मिळाली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: airoli vidhansabha afternoon trends