ऐरोली : भाजपचे गणेश नाईक विजयी
ऐरोली : भाजपचे गणेश नाईक विजयी

ऐरोली : भाजपचे गणेश नाईक विजयी Election Results 2019 esakal

ऐरोली : ऐरोली विधानसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे गणेश नाईक 78 हजार 228 मतांनी विजयी झाले आहे. नाईक यांना एकूण 1 लाख 14 हजार 038 मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीच्या गणेश शिंदे यांनी एकूण 35 हजार 810 मते मिळवत नाईक यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला. याशिवाय मनसेच्या निलेश बाणखेले यांना एकूण 22 हजार 692 मते, वंचित बहूजन आघाडीच्या डॉ. प्रकाश ढाकणे यांना एकूण 13 हजार 299 एकूण मिळाली आहेत. ऐरोलीत नोटाला 5 हजार 187 मते मिळाली आहेत.

नाईक कुटंुबीय भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर नवी मुंबईत जागा वाटपावरून तिढा निर्माण झाला होता. ऐनवेळी दोन्ही मतदार संघ भाजपला मिळाल्याने शिवसेनेच्या गोटात नाराजी पसरली होती. बेलापूरातून मंदा म्हात्रे यांना तर ऐरोलीतून माजी आमदार संदीप नाईक यांना भाजपच्या वतीने उमेदवारी देण्यात आली होती. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याने गणेश नाईकांचा पत्ता कट झाला होता. मात्र, पुत्र संदीप नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांनी आग्रह धरत गणेश नाईक यांना रिंगणात उतरण्याची गळ घातली. त्यामुळे गणेश नाईक यांनी मोठे शक्तिप्रर्दशन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर आज सकाळपासून निकालाधीच गणेश नाईक समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते होते. विजयीची खात्री असल्याने निकालाधीच ऐरोलीत नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी बॅनर लावले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com