निकालाआधीच ऐरोलीत झळकले गणेश नाईकांचे बॅनर | Election Results 2019

निकालाआधीच ऐरोलीत झळकले गणेश नाईकांचे बॅनर | Election Results 2019

गणेश नाईक यांच्या विजयाचे बॅनर ऐरोलीमध्ये लागलेत. चौथ्या फेरी नंतर ऐरोली विधानसभा मतदारसंघात गणेश नाईक  हे 8407 मतांनी आघाडीवर आहेत. ऐरोलीत भाजप उमेदवार गणेश नाईक यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार गणेश शिंदे असा सामना रंगतोय. याठिकाणी भाजप नक्कीच विजयी होईल असा विश्वास गणेश नाईक यांना आहे.

दरम्यान निकलांच्या आधीच ऐरोलीत  गणेश नाईक यांच्या विजयाचे  बॅनर लागलेत.  ऐरोलीत 42% मतदान झालंय. ऐरोली विधानसभा मतदारसंघाकरीता एक लाख 96 हजार 128 मतदारांनी हक्क बजावला. ऐरोलीतील 440 मतदान केंद्रांवरील मतदानाची 14 टेबलांवर 32 फेऱ्यांमध्ये मोजणी होईल. त्याकरीता ऐरोलीच्या सरस्वती विद्यामंदिर शाळेत निवडणूक आयोगाचे 200 हून अधिक कर्मचारी नियुक्त केले आहेत.

ऐरोलीत गणेश नाईक यांच्या उमेदवारीवरून चांगलंच नाराजीनाट्य पाहायला मिळालं होतं. ऐरोलीतून गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक यांना भाजपकडून  AB फॉर्म देण्यात आलेला. मात्र नंतर गणेश नाईक यांनीच ऐरोलीतून उमेदवारी अर्ज दाखल केला.   

Webtitle : airoli vidhansabha constetuency morning trends 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com