विमानतळबाधित गावांना फटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

नवी मुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या मातीच्या भरावामुळे विमानतळ परिसरातील गावांना पावसाच्या पाण्याचा फटका बसला आहे. गाभा क्षेत्रातील व बाहेरील गावांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साठले होते. कोल्ही, दापोली, ओवळे, तरघर, कोंबडभुजे या गावांमध्ये पुन्हा एकदा पाणी घुसल्यामुळे पूरसदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली होती. 

गावांमध्ये पुराचे पाणी घुसल्याचे कळल्यानंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी पाहणी करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांना तीन फूट साचलेल्या पाण्यातूनच गावात फिरवले. 

Web Title: Airport affected villages hit rain