‘आयकॉनिक साईट’मध्ये अजंठा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

मुंबई- ‘आयकॉनिक टुरिस्ट साइट्‌स डेव्हलपमेंट प्रोजेक्‍ट’अंतर्गत देशातील १२ क्‍लस्टरमधील १७ पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येत आहे. त्यात समावेश झालेल्या महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळ या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याची माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. 

अजिंठासह वेरूळमधील लेण्यांना पर्यटन विकासाच्या दृष्टीने जागतिक दर्जाच्या सोई-सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे रावल यांनी सांगितले. पुरातत्त्व विभाग आणि पर्यटन मंत्रालय अजिंठा लेणी परिसरात स्थानिकांना रोजगारही उपलब्ध करून देणार आहे. लेण्यांचे जतन करण्यासाठी पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. परिसरात असलेल्या असुविधा दूर करून उत्कृष्ट रस्ते, पाणी व अद्ययावत यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटनवाढीच्या दृष्टीने स्थानिक उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी व नागरिकांशी चर्चा करून आयकॉनिक टुरिस्ट साईट विकसित केल्या जातील, असे रावल म्हणाले.

Web Title: Ajanta in the iconic site